आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पद्मावती'ची रिलीजिंग डेट बदलली, 'फुकरे 2', 'फिरंगी'सह या फिल्मवर होणार परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पद्मावती' 1 डिसेंबरला रोजी रिलीज होणार नाही. ही वन ऑफ द मोस्ट अवेटिड मुव्ही मानली जात आहे. दीपिका, रणवीर आणि शाहिद स्टारर 'पद्मावती'ची रिलीज डेट बदलली आहे. त्यामुळे इतर फिल्मलाही त्यांच्या रिलीजिंग डेट बदलाव्या लागत आहेत. अशी माहिती आहे, की 1 डिसेंबरला पद्मावती रिलीज होणार नसल्याचा फायदा दुसऱ्या फिल्म्स उचलणार आहेत. यामध्ये निखिल भट्टची फिल्म ‘बृज मोहन अमर रहे’ सर्वात पुढे आहे. निखील त्याचा चित्रपट 1 नोव्हेंबरला रिलीज करणार आहे. यामध्ये अर्जुन माधूर आणि निधी सिंह यांची प्रमुख भूमिका आहे. 

 

-  ‘बृज मोहन अमर रहे’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे,की फिल्म 1 डिसेंबरला रिलीज झाली तर त्याचा नक्कीच फायदा होईल.
  - यासोबतच नवाजुद्दीनची फिल्म मॉन्सून शूटआऊट देखील 1 डिसेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. याआधी या चित्रपटाची तारीख 22 डिसेंबर सांगितली जात होती. 
  - कपिल शर्माची फिल्म फिरंगी 25 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे, याची तारीख वाढून ही फिल्म 1 डिसेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. 
  - यासोबतच फुकरे फिल्मची रिलीज डेटही चेंज होऊ शकते. ही फिल्मही 1 डिसेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...