आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bachchan, Phalke, Madhubala Bollywood Murals By Ranjit Dahiya

'दीवार'च्या अमिताभपासून ते 'मि. इंडिया'च्या मोगॅम्बोपर्यंत रंजित यांनी बनवल्या आहेत पेंटिंग्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः अमिताभ यांचे 'दीवार' या सिनेमातील पोजच्या पेटिंगसोबत पेंटर रंजीत दहिया)
मुंबई- भिंतींवर हिंदी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट सिनेमे आणि त्यातील पात्रांचे पेटिंग बनवणारे प्रसिद्ध पेंटर रंजीत दहिया यांना कोण ओळखत नाही. 2013 मध्ये सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टअंतर्गत रंजीत यांनी अनेक शहरांमध्ये कलाकारांचे पेटिंग बनवले होती. खास गोष्ट म्हणजे यासाठी त्यांनी अगदी साध्या-साध्या ठिकाणांची निवड केली.
वांद्रा परिसरात एकीकडे त्यांनी मोगॅम्बोचे तर दुसरीकडे 'दीवार'मधील अमिताभ बच्चन यांचे पेटिंग बनवले. ज्याप्रकारे रंजीत दाहिया यांनी या पेटिंग्स बनवल्या त्या लाजवाब आहेत.
मुळचे हरियाणाचे असलेल्या रंजीत यांनी चंदीगडच्या कॉलेज ऑफ आर्ट्समधून ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) येथून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
सध्या रंजीत मुंबईत फ्रिलान्स ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतात. रेल्वे स्टेशन आणि ढाब्यांवर पेटिंग करुन आपल्या करिअरची सुरुवात करणारे प्रसिद्ध पेंटर रंजीत दहिया यांनी divyamarathi.comसोबत खास बातचित केली. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि अविस्मरणीय अनुभव शेअर केलेत.
सफेदी करण्यापासून ते पेंटर बनण्यापर्यंतचा प्रवास...
रंजीत सांगतात - मी पूर्वी बिल्डिंगला सफेदी देण्याचे काम करायचो. सरळ शब्दांत सांगायचे म्हणजे, मी एक मजूर होतो, जो लोकांच्या घराला पेंट देण्याचे काम करायचा. मात्र एका घटनेने माझे आयुष्यच पालटून टाकले. झाले असे, की एका शाळेत मी सफेदीचे काम करत होते. तेथील प्राध्यापकांनी मला सरस्वतीची मुर्ती बनवणा-या कुणाला तू ओळखतोस का? असे विचारले. मी म्हटले, मीच तुम्हाला हे काम करुन देतो. त्यानंतर त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट दिला. काम पूर्ण झाल्यानंतर सर्वजण माझे काम बघून आश्चर्यचकित झाले. त्यानंतर मी आर्टला गांभीर्याने घेतले. 12वी नंतर मी चंदीगड येथून फाइन आर्ट्सची डिग्री घेतली.
पुढे वाचा, कसे बदलले पेंटर रंजीत दहिया यांचे आयुष्य...