(राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्वीकारताना कंगना राणावत)
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात अभिनेत्री कंगना रानोटला 'क्वीन' सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात कंगना डिझायनर गाऊनमध्ये दिसली. हा गाऊन न्युयॉर्कमध्ये राहणारे भारतीय डिजायनर विभू महापात्र यांनी डिझाइन केला होता. यापूर्वी विभू यांनी अमेरिकाचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांचे परिधानही डिझाइन केले आहेत.
खरं तर या पुरस्कार सोहळ्यात कंगना कांजीवरम साडी परिधान करणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र प्रत्यक्षात कंगनाने पारंपरिक साडीची नव्हे तर डिझायनर गाऊनची निवड या सोहळ्यासाठी केली.
28 वर्षीय कंगनाला मिळालेला हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी 'फॅशन' या सिनेमात उत्कृष्ट भुमिका साकारल्यामुळे कंगनाला सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या सोहळ्यात कंगना 'क्वीन'चे दिग्दर्शक विकास बहलसोबत दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 62 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात क्लिक झालेली कंगनाची खास छायाचित्रे...