Home »News» Bollywood Rapper Yo Yo Honey Singh Turn 34

दारुचे व्यसन -डिप्रेशनमुळे असा झाला हनी सिंग, बघा बालपणीपासून ते आतापर्यंतचे PHOTOS

दिव्य म राठी वेब टीम | Mar 15, 2017, 17:35 PM IST

मुंबई - भारतातील लोकप्रिय रॅपर यो यो हनी सिंह 34 वर्षांचा झाला आहे. 15 मार्च 1983ला होशियारपूरमध्ये जन्मलेला हनी सिंहचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. 2000मध्ये हनीने नवी दिल्लीच्या गुरु नानक पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना तो अमोल पालेकर यांच्या बोलण्याच्या स्टाइलला कॉपी करत होता. बालपणासूनच तो खोडकर होता आणि मिमिक्री करण्यात प्रसिध्द होता.

रिहॅब सेंटरला गेला होता...
हनी सिंगने काही दिवसांपूर्वी त्याचा एक फोटो फेसबूकवर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये हनी सिंगचा लूक चांगलाच बदललेला पाहायला मिळला. हनी सिंग काही महिन्यांपासून bipolar disorder आणि डिप्रेशनने ग्रस्त होता. पण आता तो यातून बाहेर निघलाय. पण या सर्वाचा परिणाम त्यावर झालेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कारण लूकसाठी प्रसिद्ध असलेला हनी सिंग सध्या वेगळाच दिसतोय. शिवाय हनी सिंग रिहॅब सेंटरला गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यानेच या सर्व बातम्या फेटाळल्या होत्या. मी बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त आहे. 18 महिन्यांत मी चार डॉक्टर बदलले. पण औषधांचाही परिणाम झाला नाही. माझ्याबरोबर काहीतरी विचित्र घडत होते, असे त्याने सांगितले होते. बायपोलर डिसऑर्डरबरोबरच हनी सिंगला दारुचे व्यसन जडले होते. त्याचाही त्याचा उपचार करावा लागला.

Bipolar Disorder म्हणजे काय
- या आजाराने व्यक्ती डिप्रेशन किंवा मेंटल डिसऑर्डरने ग्रस्त असतो. यामुळे संबंधित व्यक्ती अनेक आठवडे मानसिक दृष्ट्या त्रासलेला असतो.
- बायपोलर डिसऑर्डरमध्ये क्षणाक्षणाला व्यक्तीचा मूड बदलत असतो. कधी तो खूप खूश असतो तर कधी त्रासलेला असतो. अनेकदा डिप्रेशनमध्येही जाण्याची भिती असते.

कसा आला बाहेर...
- मानसिक आजारांप्रमाणेच बायपोलर डिसऑर्डरही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करण्याच अडचणी येत होत्या.
- बरेच दिवस डॉक्टरला नेमके काय झाले आहे हे निदानच होत नव्हते. त्यामुळेच हनी सिंगला चार डॉक्टर बदलावे लागले.
- त्याला अनेक दिवस औषधे सूट झाली नाही. त्यामुळे हळू हळू तो नैराश्यात जाऊ लागला होता.
- नंतर डॉक्टरांच्या एका टीमने योग्य निदान केले आणि उपचार सुरू केले. हळू हळू हनी सिंग यातून बाहेर येण्यात यशस्वी ठरला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हनी सिंगचे काही निवडक PHOTO आणि जाणून घ्या Facts

Next Article

Recommended