आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियातून वेगवेगळ्या चर्चा पण आमचे कुटुंब अतिशय सामान्यच : बच्चन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमच्या कुटुंबाबाबत माध्यमांत वेगवेगळ्या चर्चा होतात. मात्र, बच्चन कुटुंब हे अतिशय सामान्य आहे, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, नात नाव्या नंदा, पनामा पेपर रामगोपाल वर्मा यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतही बच्चन यांनी दिलखुलास चर्चा केली.

प्रश्न : एखाद्या चित्रपटाच्या प्रीमियरला संपूर्ण बच्चन परिवार उपस्थित असतो. मात्र, यात अभिषेक िकंवा ऐश्वर्या असेल तरच, असे का?
उत्तर: असे काहीही नाही. आम्ही सामान्य कुटुंबाप्रमाणेच वागतो. ऐश्वर्या किंवा अभिषेकचा चित्रपट असला तर आम्ही सर्व एकत्र येतो. कारण आम्हाला याबाबत चर्चा करता येते.

प्रश्न: अभिषेकने आजवर वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. तुम्ही त्याला अभिनेता समजता की व्यावसायिक?
उत्तर: पहिल्यांदा अभिषेक हा माझा मुलगा आहे. त्याने आजवर विविधांगी भूमिका केल्या आहेत. तो एक उत्तम अभिनेता असून त्याचे काम पाहण्यास आपल्याला नेहमीच आवडते.

प्रश्न: तुम्ही वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही काम करत आहात. जया यांची काय प्रतिक्रिया असते?
उत्तर: तीमला नेहमीच प्रोत्साहन देते. ती माझा उत्साह आणि कामाचे नेहमीच भरभरून कौतुक करते.

प्रश्न: नात नाव्या नंदा चित्रपटात येणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. हे कितपत खरे आहे ?
उत्तर: ही बातमी साफ खोटी आहे. नाव्या सध्या शिक्षणाकडे लक्ष देत आहे. तिने नुकतीच पदवी संपादन केली आहे.

प्रश्न: राम गाेपालवर्मा यांच्यासोबत ‘सरकार’चा तिसरा भाग करणार आहात का? रामूसोबत संबंध कसे आहेत?
उत्तर: रामूसोबत ‘सरकार’च्या तिसऱ्या भागाबाबत बोलणी झाली आहे. काही दिवसांनंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू हाेईल. रामू माझा मित्र असून त्याच्यासोबत चांगले संबंध आहेत.

प्रश्न: तुमचेनाव पनामा पेपर प्रकरणात आले आहे... याबाबत काय सांगाल?
उत्तर: यापूूर्वीही आपण याबाबत खुलासा केला आहे. मला जे काही उत्पन्न मिळते त्याचा कर मी आयकर विभागाकडे भरतो. त्यामुळे माझे नाव या प्रकरणात कसे आले याचे आश्चर्यच आहे.
बातम्या आणखी आहेत...