मुंबई - महान अभिनेते ९३ वर्षीय दिलीपकुमार यांना ताप आणि छातीतील संक्रमणामुळे शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे. पुढील दोन दिवस त्यांच्या प्रकृतीवर काटेकोरपणे नजर ठेवली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी सांगितले की, सध्या दिलीपकुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली असून ते अन्नपदार्थही ग्रहण करत आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, 'ट्विट'वर पसरली होती दिलीप कुमार निधनाची अफवा