आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya And Abhishek At Mumbai's Gudi Padwa Event

ऐश्वर्या-अभिषेकने उत्साहात साजरा केला गुढीपाडवा, पाहा कार्यक्रमाचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. यादिवशी सर्व दु:ख, वाईट अनुभव विसरून नवीन वर्षाची उत्साहात सुरुवात केली जाते. काल (21 मार्च) मुंबईमध्ये मनसेच्या वतीने जुहू परिसरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेने ढोलताशांच्या गजरात 100 फुटांची गुढी उभारली होती. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन यांचीदेखील उपस्थिती होती.
दोघे ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसले. ऐश्वर्या पांढ-या रंगाच्या पंजाबी ड्रेस आणि अभिषेक कुर्ती-पायजमा आणि कोटमध्ये दिसला. दोघांनी गुढीचे दर्शन घेऊन सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुध्दा मराठी बाधवांना सोशल मीडियावरून हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनची या कार्यक्रमादरम्यानची छायाचित्रे...