आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याच्या प्रेयर मीटमध्ये हसताना दिसली शशी कपूर यांची कन्या, राकेश रोशन, जितेंद्रही पोहोचले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शशी कपूर यांची प्रेयर मीट गुरुवारी मुंबईतील पृथ्वी थिएटर येथे झाली. कपूर फॅमिलीसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिवंगत शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी उपस्थित होते. यावेळी शशी कपूर यांची मुलगी संजना मात्र हसताना कॅमेरात कैद झाली. शशी कपूर यांचे धाकटे चिरंजीव कुणाल कपूरही यावेळी संजनासोबत होते. 

 

- शशी कपूर यांच्या प्रेयर मीटमध्ये त्यांचे जावई वाल्मीक थापर, बॉलिवूड अभिनेता जितेंद्र, राकेश रोशन, नात करिश्मा कपूर, रानी मुखर्जी, रेखा, प्रेम चोप्रा, पुतण्या रणधीर कपूर, सून बबिता, राजीव कपूर, शम्मी कपूर यांची पत्नी नीला देवी, कुणाल खेमू, सोहा अली खान, कृष्णा राज कपूर, नीतू कपूर, डिंपल कपाड़िया, विंदू दारा सिंह, नीलम, अब्बास-मस्तान, सुनील शेट्टी, किरण राव, महीप कपूर, मधुर भंडारकर आणि पूनम ढिल्लन आले होते.   

- याशिवाय गुलजार, डॅनी, दिलीप ताहिल, नंदिता दास, अंजन श्रीवास्तव, चंकी पांडे, जूही बब्बर आणि सारिका देखील उपस्थित होते. 
- शशी कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर 5 डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. 
- शशी कपूर यांची प्तनी जेनिफर यांचे निधन कँसरमुळे 1984 मध्ये झाले होते.  

- शशी कपूर यांच्या निकटवर्तींच्या म्हणण्यानुसार पत्नी जेनिफरच्या जाण्याने ते अतिशय एकटे झाले होते. त्यांना तीन मुलं करण कपूर, संजना कपूर आणि कुणाल कपूर आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शशी कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले हे सेलेब्स... 

बातम्या आणखी आहेत...