आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Stars Attend Sikander Kher’s Engagement To Sonam Kapoor’s Cousin

अनुपम खेरच्या मुलाचा सोनम कपूरच्या मावस बहिणीशी साखरपुडा, पोहोचले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुपम-किरण खेर, अनिल कपूर, जया आणि अभिषेक बच्चन, इनसेटमध्ये मावस बहीण प्रियासोबत सोनम कपूर यांचा फाइल फोटो - Divya Marathi
अनुपम-किरण खेर, अनिल कपूर, जया आणि अभिषेक बच्चन, इनसेटमध्ये मावस बहीण प्रियासोबत सोनम कपूर यांचा फाइल फोटो
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता सिकंदर खेरचा शुक्रवारी रात्री साखरपुडा झाला. सिकंदर अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री किरण खेर यांचा मुलगा आहे. अभिनेत्री सोनम कपूरची सख्खी मावस बहीण प्रिया सिंगसोबत सिकंदर ऑफिशिअली एन्गेज झाला आहे.
सिकंदरची भावी वधू प्रिया ही इंटेरियर डिझायनर कविता सिंग आणि एसीजीचे प्रमुख जसजित सिंग यांची कन्या आहे. अभिनेते अनिल कपूर यांची पत्नी सुनीता आणि कविता सिंग या सख्ख्या बहिणी आहेत. या नात्याने सोनम आणि प्रिया या बहिणी आहेत. प्रियाचे 39 वर्षीय आशिष महुबानीसोबत लग्न ठरले होते. मात्र गेल्यावर्षी हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला. चार महिन्यांपूर्वीच प्रिया आणि सिकंदरची भेट झाली होती. या भेटीचे रुपांतर आता लग्नात होत आहे.
सिकंदर आणि प्रियाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे अनुपम आणि किरण खेर होस्ट होते. या कार्यक्रमाला अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता, अभिषेक बच्चन, जया बच्चन, पामेला चोप्रांसह अनेक जण पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, साखरपुड्याला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...