आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: डिंपल यांनी नातवासोबत तर ऋषी-नीतू यांनी नातीसोबत केले गणपती विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री डिंपल कपाडिया, अभिनेते ऋषी कपूरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोमवारी आपल्या गणरायाला निरोप दिला. या सेलिब्रिटींच्या घरी पाच दिवस पाहुणचार घेतल्यानंतर गणराय आपल्या गावाला निघाले. स्टार्सनीही आपल्या कुटुंबासोबत बाप्पाला निरोप दिला. डिंपल कपाडिया यांनी त्यांचा नातू आणि अक्षय-ट्विंकलचा मुलगा आरवसोबत तर ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनी त्यांची नात समारा साहनीसोबत गणपती विसर्जन केले.
डिंपल कपाडियासोबत त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना, नात नितारा आणि नातू आरव या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. तर ऋषी कपूर पत्नी नीतू, मुलगी रिद्धिमा आणि नात समारासोबत दिसले.
याशिवाय अभिनेता विवेक ओबरॉयनेसुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत गणरायाला निरोप दिला. यावेळी विवेकचे वडील सुरेश ओबरॉय, त्यांची पत्नी यशोधरा ओबरॉय, सून प्रियांका ओबरॉय, नातू विवान वीर ओबरॉय आणि नात अमया यावेळी दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गणपती विसर्जनावेळी क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...