आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद खन्नांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा, ऋषी कपूर म्हणाले - \'मिस यू अमर\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं आज (27 एप्रिल) निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद खन्ना यांच्या निधनाचे वृत्त येताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. 'अमर अकबर अँथोनी' या सिनेमातील विनोद खन्ना यांचे सहकलाकार ऋषी कपूर यांनी या सिनेमाचा एक फोटो पोस्ट करुन, "Will miss you Amar. RIP", असे ट्विट केले. 

ऋषी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेते रजनीकांत यांनी ट्विटरवर लिहिले, "My dear friend Vinod Khanna... will miss you, RIP. My heartfelt condolences to the family." 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही विनोद खन्ना यांना श्रद्धांजली वाहिली. अक्षय कुमार, करण जोहर, काजोल, महेश भट, अजय देवगन, अनुष्का शर्मा, नाना पाटेकर, सोनाक्षी सिन्हा, रवीना टंडन यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली दिली.  
बातम्या आणखी आहेत...