बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी मंगळवारी मुंबईतील जुहूस्थित इस्कॉन टेंपलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. पाच वर्षे कॅन्सरशी लढा दिल्यानंतर आदेश यांची 5 सप्टेंबर रोजी प्राणज्योत मालवली होती.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आदेश श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन, त्यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने, जुही चावला, पूनम सिन्हा, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, नेहा धुपिया, शेखर सूमन, सतीश कौशिक या कलाकारांसोबतच संगीतसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रीतम, सुदेश भोसले, उदित नारायण, अनू मलिक, इला इरुण, पंडीत जसराज या मान्यवरांनी आपल्या मित्राला श्रद्धांजली दिली.
यावेळी आदेश यांच्या पत्नी विजेता पंडीत यांना अश्रु अनावर झाले होते. या सर्व कलाकारांनी विजेता आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे सांत्वन केले.
पाहा, आदेश श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या कलाकारांची छायाचित्रे...