आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी स्‍वत:चे अस्तित्‍व सिध्‍द करावे; महिला दिनानिमित्‍त ट्विकंल खन्‍नाचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात महिलांसोबत आजही मोठ्याप्रमाणात भेदभाव केला जातो. भेदभावाच्‍या आवरणाखाली महिलांना अत्‍यंत असुरक्षित आयुष्‍य जगावे लागते. संविधानाने स्त्री-पुरुषांना समान हक्‍क दिलेले आहे. मात्र फक्‍त कायद्याने बदल होणार नाही. त्‍यासाठी समाजात आणि आपल्‍यातही स्‍त्रीयांप्रती आदर निर्माण होणे आवश्‍यक आहे. 
 
आपण अशा काळात महिला दिन साजरा करत आहोत जेव्‍हा महिलांच्‍या सुरक्षिततेसंबधी देशात आणि जगभरात चिंतेच वातावरण आहे. यादिवशी आपण सर्वांनी महिलांच्‍या सन्‍मान आणि हक्‍कांबद्दल गांभीर्याने चर्चा केली पाहिजे. महिला दिनाचे औचित्‍य साधून बॉलिवूड स्‍टार्सनी मधुरिमाच्‍या मंचावर याविषयी आपली भूमिका मांडली. जाणून घेऊया बॉलिवूड स्टार्सची मते. 
 
ट्विंकल खन्‍ना -
जाती, समाज, परंपरांच्‍या जोखडाखाली हजारो वर्षे दबलेल्‍या महिलांनाही स्‍वत:च्‍या मर्जीने जगण्‍याचा हक्‍क आहे. 

प्रत्‍येक महिलेने स्‍वत:चे अस्तित्‍व सिध्‍द केले पाहिजे 
आत्‍मविश्‍वासाने आपला मुद्दा मांडणाऱ्या महिलेला कुत्सितपणे फेमिनिस्‍ट म्‍हटले जाते. मात्र माझा तर प्रश्‍नच असा आहे की, तुम्‍ही कोणत्‍याही महिलेला किंवा तिच्‍या उपस्थितीला दुर्लक्षित कसे काय करु शकता? महिलांना जणू काही अस्तित्‍वच नसते, त्‍या स्‍वत: विचार करु शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही. असाच अनेकांचा समज असतो. कित्‍येक वेळेस महिलांना काहीही कारण नसताना विरोध केला जातो. ज्‍या महिला जागृत झाल्‍या आहेत त्‍यांना याचा राग येणारच आणि त्‍यामुळे त्‍यांचा आवाज वाढल्‍यास हे स्‍वाभाविकच आहे. 
 
तुम्‍ही आपल्‍याकडील कुटुंब पध्‍दतीचेच उदाहरण घ्‍या. महिलांना स्‍वतंत्र, वेगळे विचार व्‍यक्‍त करण्‍याचे कोणतेही स्‍वातंत्र्य नाही. परंपरेच्‍या नावाखाली तिला शांत बसविले जाते. कित्‍येक घरांमध्‍ये अतिशय सामान्‍य गोष्‍टींनाही वाईट मानले जाते.  मासिक पाळीच्‍या संदर्भात आपण वैज्ञानिक दृष्‍टीकोनातून आजही विचार करु शकत नाही. 

मी खन्‍ना आहे, हीच माझी ओळख  
मी अशा परिवारात वाढले आहे जिथे फेमिनिझम आणि स्‍त्रीयांच्‍या हक्‍कासंबंधींचे विचार प्रत्‍यक्ष आचरणात आणले जात होते. मी आजही खन्‍ना हेच आडनाव लावते, भाटिया किंवा मिसेस कुमार नाही. याच्‍यात चुकीचे काय आहे? खन्‍ना हीच माझी ओळख होती. ती मी का बदलावी?
 
आजही महिलांची ओळख तिच्‍या नात्‍यांच्‍या आधारावर का केली जाते? काय तिला स्‍वत:चे अस्तित्‍व नाही. तिचीही स्‍वतंत्र ओळख असू शकते. कुटुंबातील मुलांच्‍या करिअरकडे ज्‍या पध्‍दतीने लक्ष दिले जाते तसेच मुली, बहीण किंवा सुनेच्‍या करिअरकडे का दिले जात नाही?
 
आम्‍ही कोणत्‍या परिस्थितीतून जातो हे सांगू शकत नाही 
महिलांना दरदिवशी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्‍यातील काही त्रास महिला व्‍यक्‍त करतात. मात्र अनेकदा त्‍यांना त्‍या सांगता येत नाहीत. मुलींवर तर इतका दबाव असतो की त्‍या ते सांगूच शकत नाही. बंगळुरुचीच घटना घ्‍या. अशी कोणतीच मुलगी नसेल जिच्‍यासोबत अशाप्रकारची घटना बस, ट्रेन किंवा गर्दीच्‍या ठिकाणी घडली नसेल. असा अनुभव आलेल्‍या मुलीला असेच वाटत असते की, कधी एकदा घरी जाते आणि त्‍या घाणेरड्या स्‍पर्शाला पाण्‍याने धुवून टाकते. मात्र तो घाणेरडा अनुभव कित्‍येक दिवस मनातून जात नाही. अशा वेळेस किती वाईट वाटते हे आम्‍ही कोणालाच सांगू शकत नाही. 
 
तिच्‍या निर्णयावर विश्‍वास ठेवा 
प्रत्‍येक घरात महिलेला स्‍वातंत्र्य आणि सन्‍मान तर दिलाच पाहिजे पण त्‍याच बरोबर तिच्‍या निर्णयावर विश्‍वास देखील ठेवला पाहिजे. याची सुरवात स्‍वत:पासून करायला हवी. भाऊ आणि मुलाचे विचार सुधारण्‍याची सुरवात आपल्‍या घरापासून करावी लागेल. 
 
पुढील स्‍लाइडसवर वाचा, काय म्‍हणाला शाहरुख खान महिलांच्‍या सुरक्षिततेसबंधी... 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...