आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या भाचीने दिला बाप्पाला निरोप, शिल्पा-गोविंदानेही केले आपल्या गणरायाचे विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरती करताना एलिजा अग्निहोत्री, बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाताना गोविंदा आणि ताल धरताना शिल्पा... - Divya Marathi
आरती करताना एलिजा अग्निहोत्री, बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाताना गोविंदा आणि ताल धरताना शिल्पा...
मुंबईः दीड दिवस पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या गावाला निघाले. मंगळवारी अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपल्या गणरायाला निरोप दिला. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये धुमधडाक्यात गणरायाला निरोप देण्यात आला. 'ट्युबलाइट' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने सलमानला यंदा गणेशोत्सवात सहभागी होता आले नाही. सलमान सध्या शिमल्यात सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमानच्या गैरहजेरीत त्याच्या कुटुंबीयांनी श्रींना निरोप दिला. सलमानची भाची एलिजा अग्निहोत्रीसह त्याच्या बहीण अलविरा-अर्पिता, भाऊ सोहेल, वडील सलीम खान आणि आई सलमा खान आणि हेलन यावेळी उपस्थित होते.

शिल्पा-गोविंदानेही केले बाप्पाचे विसर्जन...
शिल्पा शेट्टी आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून बाप्पाचे विसर्जन केले. यावेळी राज कुंद्रा आणि शमिता शेट्टी यांच्यासह शिल्पाने ढोलवर ताल धरला. गोविंदाने मुलगी टीना, पत्नी सुनीता आणि मुलगा यशवर्धन आहुजा यांच्यासोबत पुढील वर्षी लवकर या म्हणत श्रींना निरोप दिला. याशिवाय अनिल कपूर, हृतिक रोशनची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, सोनाली बेंद्रे, संजय दत्त आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी गणपतीला निरोप दिला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बाप्पाच्या विसर्जनात सहभागी झालेल्या स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...