आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमोच्या सिनेमात सलमानसोबत झळकणार जॅकलीन फर्नांडिस, ही आहे फिल्मची वनलाईन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेमो डिसूझाच्या आगामी चित्रपटात सलमान खान एका वर्षांच्या मुलीच्या वडिलांची भूमिका करणार आहे. या चित्रपटात सलमानची हीरोइन कोण असेल, यावर खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती, मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागले आहे. 
 
सूत्रानुसार, या चित्रपटात दिग्दर्शकांनी जॅकलीन फर्नांडिसला घेतले आहे. 'किक'नंतर जॅकलीन पुन्हा एकदा सलमानसोबत दिसणार आहे. सलमाननेदेखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, चित्रपटात मी अशा व्यक्तीची भूमिका करत आहे ज्याच्या पत्नीचा मृत्यू झालेला असतो. त्याची मुलगी फक्त वर्षांची आहे. मुलीची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करेल, असे वचन त्याने पत्नीला मृत्यूपर्वी दिलेले असते. 

या चित्रपटात मुलीची इच्छा असते की, वडिलांनी एका डान्स स्पर्धेत भाग घ्यावा, त्यामुळे त्याला डान्स शिकावा लागतो. तेव्हा जॅकलीन त्याला ट्रेनिंग देते. सलमान पुढे म्हणाला, फक्त डान्सने भरपूर असलेला चित्रपट करण्याचे उरले होते, या निमित्ताने तेही झाले. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...