आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अभिनेते अमृत पाल यांचे निधन, अनेक चित्रपटांत साकारल्या होत्या खलनायकाच्या भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिंदी चित्रपटांत खलनायकाची भूमिका गाजवणारे अभिनेते अमृत पाल (७६) यांचे सोमवारी संध्याकाळी मालाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते लिव्हर सिरॉसिसच्या आजाराने ग्रस्त होते. १९८० व १९९० च्या दशकांतील विविध हिंदी चित्रपटांमध्ये पाल यांनी खलनायकी भूमिका गाजवल्या. 
 
त्यांनी सुमारे १०० चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. धर्मेंद्र, विनोद खन्ना, अनिल कपूर, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, रेखा, मुनमुनसेन, मंदाकिनी अशा  प्रसिद्ध नायक- नायिकांनी काम केलेल्या चित्रपटांमध्ये अमृत पाल यांनी खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. 'कसम', 'प्यार के दो पल', 'फरिश्ते' आदी त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. अमृत पाल यांना लिव्हर सिरॉसिस झाल्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या दुर्बल झाले होते. साहजिकच त्यांचे चित्रपटांतील कामे करणेही त्यामुळे थांबले होते. पूनम धिल्लन व मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या व राजीव मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्यार के दो पल’ या चित्रपटात अमृत पाल यांनी केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. 
बातम्या आणखी आहेत...