आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आई'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध निरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये झाली 'दुश्मनी', जाणून घ्या कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः निरुपा रॉय, त्यांचे पती, दोन्ही मुले - किरण आणि योगेश, आणि त्यांचे मुंबईतील अपार्टमेंट - Divya Marathi
फाइल फोटोः निरुपा रॉय, त्यांचे पती, दोन्ही मुले - किरण आणि योगेश, आणि त्यांचे मुंबईतील अपार्टमेंट

मुंबईः बॉलिवूडची फेव्हरेट आई म्हणून प्रसिद्ध निरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये संपत्तीवरुन वाद निर्माण झाल्याचे वृत्त मुंबई मिररने प्रसिद्ध केले आहे. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. निरुपा रॉय यांचे 2004 साली निधन झाले होते. त्यांना योगेश आणि किरण ही दोन मुले आहेत. मुंबईतील नेपियन सी रोडवर असलेल्या घरावरुन त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये वाद सुरु असून या घराती किंमत सध्या 100 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.
किरण (45) चे कुटुंब आणि योगेश (57) अँबेसी अपार्टमेंटमधील चार बेडरुम असलेल्या ग्राउंड फ्लोअर फ्लॅटमध्ये एकत्र राहतात. हा फ्लॅट निरुपा रॉय यांनी 1963 साली दहा लाखांमध्ये खरेदी केला होता. दोन्ही भावांच्या वाट्याला दोन-दोन बेडरुम येत असून ते 3000 स्वे. फुट परिसरात ते आहे. याशिवाय या फ्लॅटला 8000 स्वे. फूटचा गार्डन एरियासुद्धा आहे.
निरुपा रॉय यांच्या निधनानंतर त्यांचे पती कमल रॉय या संपत्तीचे मालक झाले. कमल रॉय यांच्या निधनानंतर करण आणि योगेश यांच्यातील वाद आणखीनच वाढला. किरण यांनी मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये थोरल्या भावाने घरावर हक्क सांगितला असून, आपल्यावर दबाव टाकत असल्याचा उल्लेख केला आहे. ही याचिका त्यांचे वकील जुल्फीकार मेनन यांनी त्यांच्यावतीने दाखल केली आहे.

पुढे वाचा, काय म्हटले गेले आहे याचिकेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...