मुंबई: '3 इडियट्स' सिनेमात 'व्हायरस'च्या भूमिकेने लोकप्रिय झालेला अभिनेता बोमन ईराणी आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा दनेश आणि सून रिया पहिल्या मुलाचे आई-वडिल झाले आहेत. आजोबा झाल्याच्या आनंदात बोमन यांनी कुटुंबात आलेल्या नवीन पाहूण्याचे स्वागत टि्वट करून केले.
जाणून घ्या आजोबा झाल्यानंतर काय म्हणाले बोमन...
56 वर्षीय अभिनेते बोमन यांनी टि्वट केले, 'माझी सून आज आई झाली. माझा मुलगा बाबा झाला. माझी पत्नी आजी आणि मी आता आजोबा झालो आहे.' बोमन यांना आजोबा झाल्याच्या अनेक बॉलिवूडकरांनी शुभेच्छा दिल्या. त्यात विशाल ददलानी, साजिद खान, सोफी चौधरी, रितेश देशमुख बिपाशा बसु आणि प्रियांका चोप्रा सामील आहेत. रिया आणि दनेश यांचे लग्न पासरी पध्दतीने 17 नोव्हेंबर 2011ला दक्षिण मुंबईत झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बोमन कुणी-कुणी शुभेच्छा दिल्या...