आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॉम्बे वेलवेट'ला मिळाले यू/ए प्रमाणपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिवायझिंग कमिटीने चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्ये हटवत यू/ए प्रमाणपत्र दिले असले, तरी कथानकामध्ये बदल होऊ नये म्हणून अॅक्शन आणि हिंसात्मक दृश्यांना जीवदान देण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते.

फिल्मफेअर पुरस्कारविजेता 'सत्या' आणि ऑस्करसाठी नामांकित झालेल्या 'वॉटर' या चित्रपटांसाठी पटकथालेखन केलेल्या अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वेलवेट' हा पहिलाच मोठ्या स्टुडिओचा चित्रपट ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचे 'ब्लॅक फ्रायडे', 'नो स्मोकिंग', 'देव डी', 'गुलाल', 'दॅट गर्ल इन यलो बूट्स' आणि 'गँग्ज ऑफ..' हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. अनुरागने आपल्या पहिल्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाला प्रोढ प्रमाणपत्र मिळू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. कारण प्रौढ चित्रपटाची निर्मिती करणारे दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. 'बॉम्बे वेलवेट'चे निमिर्ती बजेट १२० कोटी असून याच्या भरपाईसाठी प्रेक्षकांचा प्रत्येक वर्ग चित्रपटाशी जोडला जाईल, असा कश्यप यांचा प्रयत्न राहणार आहे.
सुरुवातीला सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्यास नकार देत अनेक दृश्यांवर आक्षेप घेतला. त्यामुळे अनुरागने रिवायझिंग कमिटीकडे धाव घेतली. कमिटीने मात्र 'बॉम्बे वेलवेट'ला यू्/ए प्रमाणपत्राद्वारे पास करण्याबरोबरच चित्रपटामधील काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम तर अनुष्का-रणवीरमधील एका लिपलॉक दृश्यावर कात्री लावली आहे. त्याचबरोबर एका गाण्यातून धोबी शब्द वगळण्यात आला आहे.