आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Bombay Velvet' Gets U A Rating From Revising Committee Of Central Board

FRIDAY RELEASE : 'बॉम्बे वेलवेट'मध्ये दिसणार नाही रणबीर-अनुष्काचा हॉट इंटीमेट सीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-अनुष्का शर्मा स्टारर 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला पहिलेच प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. आता सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र या सिनेमाविषयी सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रिवायझिंग कमिटीने या सिनेमातील रणबीर आणि अनुष्काच्या एका पॅशनेट किसींग सीनला कात्री लावली आहे. शिवाय सिनेमातील शिवीगाळ असलेले संवादसुद्धा वगळण्यात आले आहेत.
खरं तर ट्रेलरच्या रिलीजपासूनच लेडी सीरियल किसर अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेले चुंबन दृश्य चर्चेचा विषय ठरले होते. प्रेक्षकांना सिनेमाकडे आकर्षित करण्यासाठी दिग्दर्शकाने आवर्जुन रणबीर आणि अनुष्कावर पॅशनेट किसींग सीन चित्रीत केला होता. मात्र सेन्सॉर या सीनलाच कात्री लावणार होते. जर हा किसींग सीन सिनेमात ठेवला असता तर सिनेमाला अॅडल्ट सर्टिफिकेट मिळाले असते. मात्र अनुराग कश्यप यांना हे मान्य नव्हते. कारण अॅडल्ट टॅगमुळे सिनेमाचा प्रेक्षक वर्ग कमी झाला असता आणि सिनेमाच्या 100 कोटींच्या व्यवसायावरसुद्धा त्याचा निश्चितच परिणाम झाला असता. त्यामुळे अनुराग यांनी रिवायझिंग कमिटीकडे धाव घेतली. रिवायझिंग कमिटीने सिनेमाला अॅडल्ट टॅग न देता यूए सर्टिफिकेट दिले. मात्र हे सर्टिफिकेट देताना सिनेमातील पॅशनेट किसींग सीनला कात्री लावली. रिवायझिंग कमिटीने चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्ये हटवत यू/ए प्रमाणपत्र दिले असले, तरी कथानकामध्ये बदल होऊ नये म्हणून अॅक्शन आणि हिंसात्मक दृश्यांना जीवदान देण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजते.
कमिटीने 'बॉम्बे वेलवेट'ला यू्/ए प्रमाणपत्राद्वारे पास करण्याबरोबरच सिनेमामधील काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम तर अनुष्का-रणवीरमधील एका लिपलॉक दृश्यावर कात्री लावली आहे. त्याचबरोबर एका गाण्यातून 'धोबी' शब्द वगळण्यात आला आहे. आता रणबीर-अनुष्काच्या किसींग सीनशिवाय हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा ओलांडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बॉम्बे वेलवेट'मधील रणबीर-अनुष्काच्या इंटीमेट सीन्सची झलक खास छायाचित्रांमध्ये..