मुंबई - नव्वदच्या दशकातील चित्रपट बॉर्डर रिलीज होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 13 जून, 1997 ला रिलीज झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने केलेल्या खास चर्चेमध्ये त्यांनी या चित्रपटाबाबत अनेक सिक्रेट बाबी शेयर केल्या आहेत. उदाहरणार्थ चित्रपटात अक्षय खन्नाच्या (लेफ्टनंट धर्मवीर भान) भूमिकेसाठी आधी सलमान खानला संपर्क केला होता. पण सलमानने नकार दिला.
सलमाननंतर अक्षय आणि अजय देवगणशीही झाली चर्चा
जेपी दत्ता यांच्यामते जेव्हा सलमान खान चित्रपटासाठी तयार जाला नाही, त्यानंतर त्यांनी अक्षय कुमारशी चर्चा केली. त्यानेही नकार दिल्यानंतर अजय देवगणला विचारण्यात आले. पण अजयने मल्टीस्टारर चित्रपट असल्याने नकार दिला. अखेर अक्षय खन्नाबरोबर या भूमिकेबाबत चर्चा झाली आणि त्याने होकार दिला.
पुढे वाचा, जेपी दत्ता यांना कोणाकडून मिळाली होती 'बॉर्डर'ची आयडिया..