आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 भारतीय सिनेमे, ज्यांनी वर्ल्डवाईड केली 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः एक काळ असा होता, जेव्हा भारतीय सिनेमांची 100-200 कोटींची कमाई खूप जास्त समजली जायची. मात्र आजच्या काळात एखाद्या सिनेमाचे बजेटच 100-200 कोटींच्या घरात असते. गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या 'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' या सिनेमांचे उदाहरण घ्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाचा निर्मिती खर्च 160 कोटी इतका होता. तर कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचे बजेट 90 कोटींच्या घरात राहिले. खास गोष्ट म्हणजे या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईच केली नाही, तर नवीन रेकॉर्डही प्रस्थापित केले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.
2009 मध्ये रिलीज झालेल्या राजकुमार हिराणी यांच्या '3 इडियट्स' या सिनेमाने वर्ल्डवाइड 395 कोटींचा गल्ला जमवला होता. या सिनेमानेच 300 कोटी क्लबला सुरुवात केली होती. त्यानंतर 'एक था टाइगर' (2012), 'दबंग 2' (2012), 'ये जवानी है दीवानी' (2013), 'कृष 3' (2013), 'किक' (2014), 'बँग बँग' (2014) आणि 'हॅपी न्यू ईयर' (2014) हे सिनेमे 300 कोटी क्लबमध्ये सामील झाले. 2013 मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शित रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाने 422 कोटींची कमाई करुन 400 कोटी क्लबला सुरुवात केली. याचवर्षी दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्यच्या 'धूम 3' या सिनेमाने 500 कोटी क्लबला सुरुवात केली. आत्तापर्यंत चार भारतीय सिनेमे 500 कोटींहून अधिकचा व्यवसाय करण्यात यशस्वी झाले आहेत.
'बाहुबली' या सिनेमाचे वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन वर दिले आहे. इतर तीन सिनेमांच्या कलेक्शनविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...