आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOX OFFICE: \'बजरंगी भाईजान\'ने पहिल्याच दिवशी जमावला 40 कोटींचा गल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या ईद रिलीजला ब्लॉकब्लस्टर मानले जाते. परंतु 'बजरंगी भाईजान'ने रमजान ईदच्या शेवटच्या शुक्रवारी पहिल्याद दिवशी जवळपास 40 कोटींचा बिझनेस केला आहे. रमजानमध्ये रोजा असल्याने काही लोक सिनेमा पाहण्यास पसंती देत नाहीत.
'बॉडीगार्ड' (2011) आईच्या दिवशी शुक्रवारीच रिलीज झाला होता. सिनेमा पहिल्याच दिवशी 22 कोटींची कमाई केली होती. 'एक था टायगर' 15 ऑगस्टनिमित्त रिलीज झाला होता आणि सिनेमाने पहिल्या दिवशी 33 कोटींचा व्यवसाय केला होता. हे दोन्ही आकडे त्यावेळी रेकॉर्ड बनले होते.
मागील वर्षी आलेल्या शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाने पहिल्याच दिवशी 44 कोटींची कमाई केली होती. शाहरुखचा हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर आला होता. मात्र आमिरच्या 'पीके'ला एवढीच मोठा ओपनिंग मिळाली नव्हती. मात्र त्याचे आणि राजकुमार हिराणी यांचे सिनेमे दिर्घकाळ थिएटरमध्ये लागलेले असतात.
'बजरंगी...'च्या चांगल्या प्रदर्शनामुळे इंडस्ट्रीचे तज्ञ सलमानच्या फॅन फॉलोइंग आणि थिएटरच्या वाढत्या संख्यांवर विश्वास ठेवतात. शुक्रवारी अनेक थिएटर्समध्ये गर्दीमुळे शोची संख्या वाढवावी लागली.
राजहंस, अहमदाबादमध्ये सकाळी 8 वाजेचा शो एकाच स्क्रिनर होता, परंतु गर्दीमुळे इतर सिनेमे रद्द करून 8:20 आणि 9 वाजता तीन शो थिएटरमध्ये लावण्यात आले.

एंटरटेन्मेंट पॅराडाइज जयपूरमध्येसुध्दा सकाळी 9 वाजता केवळ एक शो लागलेला होता, मात्र 9 ते 9:30च्या मध्ये तीन स्क्रिनवर शो घाईने लावण्यात आले. नागपूरमध्ये कमल आणि पंचशील सिनेमा, हरदा (मध्यप्रदेश)च्या प्रताप टॉकीज, पंजाब आणि देशातील इतर शहरांमध्येसुध्दा शोंची संख्या अचानक वाढवण्यात आली.