आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'ची कोटीच्या कोटी उड्डाणे, केवळ 5 दिवसांत जमवला 215 कोटींचा गल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई : 'बाहुबली : दि बिगिनिंग' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या पाच दिवसांतच तब्बल 215 कोटींची कमाई केली आहे. केवळ 5 दिवसांत 200 कोटी क्लबमध्ये सामील होऊन या सिनेमाने नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. चित्रपट समीक्षक त्रिनाथ यांनी या सिनेमाला जलद गतीने 200 कोटी क्लबमध्ये सामील होणारा पहिला भारतीय सिनेमा म्हटले आहे. (वाचा, 'बाहुबली'साठी वेरुळ-अजिंठ्यावरुन मिळाली प्रेरणा)
'बाहुबली'ने पहिल्याच दिवशी सुमारे 10 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. यापूर्वी शाहरुख खान अभिनीत 'हॅपी न्यू इयर' या सिनेमाच्या नावावर 46 कोटींच्या सर्वाधिक कमाईचा विक्रम होता. यानंतर 'बाहुबली'ने आता पाच दिवसांत 200 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. (वाचा, 'बाहुबली'ची पडद्यामागची कहाणी)
दक्षिण भारताप्रमाणेच उत्तरेतदेखील या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया ही बडी स्टारकास्ट मंडळी या सिनेमात आहेत. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि रजनीकांतदेखील हा सिनेमा पाहून प्रभावित झाले आहेत. (वाचा, कोणत्या सिनेमाची कॉपी आहे 'बाहुबली')
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बाहुबली' सिनेमाचे ऑन लोकेशन फोटोज...