आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत जाताना मुले स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न करायचे, परिणितीने सांगितली आपबिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परिणिती चोप्रा नुकतीच मुंबईत 'वुमन सेल्फ डिफेन्स ग्रॅज्युएशन डे' इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. परिणितीने सांगितले की, मी सायकलवर शाळेत जायचे. कारण आमच्याकडे कार खरेदी करायला पैसे नव्हते. मला कोणी त्रास देऊ नये म्हणून माझ्या मागे माढे वडील सायकलवर यायचे. त्यावेळी मला नेहमी मुले छेडायचे. अगदी माझा स्कर्ट वर करण्यापर्यंत ते मर्यादा ओलांडत होते. 

आई वडिलांचा करू लागली होती तिरस्कार 
- परिणितीने पुढे सांगितले की, मला सायकलवर शाळेत पाठवले जायचे म्हणून मी आई वडिलांचा तिरसक्रा करू लागले होते. पण मी त्यांना बोलले तर ते म्हणायचे की, आम्हाला तुला स्ट्राँग बनवायचे आहे. 
- या इव्हेंटमध्ये अक्षय कुमारही परिणितीसोबत उपस्थित होता. परिणितीने अक्षयचे कौतुक केले. ती म्हणाली, तुम्ही मुलांना स्व संरक्षण शिकवण्यासाठी पैसे आकारत नाही, आणि त्यासाठी तुम्हाला गणवेश धारण करण्याचीही गरज नाही याचा मला आनंद आहे. 
- तुम्हाला सर्वांना अशा सुविधा मिळत आहेत, ज्या एकेकाळी मला मिळाल्या नाहीत. तुम्हाला कोणालाही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू नये असे मला वाटते. पण तसे झाले तर त्याच्या तोंडावर पंच मारल्याशिवाय राहू नका. 

गोलमालच्या रिलीजची पाहतेय वाट 
- अंबाला, हरियाणामध्ये जन्मलेल्या परिणितीने 2011 मध्ये 'लेडीज वर्सेस रिक्की बहल' चित्रपटातून डेब्यू केला होता. 
- नुकताच तिने आयुष्यमान खुरानाबरोबर 'मेरी प्यारी बिंदू' चित्रपट केला. 
- लवकरच ती अजय देवगण स्टारर आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसेल. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होत आहे. 

पुढील स्लाइडवर.. वुमन सेल्फ डिफेन्स ग्रॅजुएशन डेमदील परिणिती आणि अक्षयचे 3 फोटोज..
 
बातम्या आणखी आहेत...