आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह मेकिंग सीन्समुळे वादात अडकला ब्रेट लीचा सिनेमा, सेन्सॉरने चालवली कात्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट लीचा 'अनइंडियन' हा सिनेमा लव्ह मेकिंग आणि इंटीमेेट सीन्समुळे वादात अडकला आहे. सिनेमात ब्रेट ली आणि अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी यांच्यावर लव्ह मेकिंग सीन्स चित्रीत झाले आहेत. सेन्सॉरने या सिनेमातील इंटीमेट सीन्स ६८ सेकंदांवरुन २६ सेकंद केले आहेत. अलीकडेच ब्रेट ली सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आला होता.

लव्ह मेकिंग सीन्सच्या बॅकग्राऊंडला वाजतो मंत्र...
सिनेमातील एका सीनमध्ये तनिष्ठा आणि ब्रेट ली यांच्यात इंटीमेट सीन्स सुरु असताना 'ओम श्रीं ह्मीं' या मंत्राचा आवाज येतो. त्यामुळे हा वाद निर्माण झाला. सेन्सॉर बोर्डाच्या मते, सिनेमातील साइडवेचे व्हिज्युअल काढून आणि क्लायमॅट शॉट लवकर संपवायला हवा. शिवाय सेक्स सीन आणि मंत्रोच्चार एकत्र यायला नकोत. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील अनेक सीन्सवर कात्री फिरवत त्याला U/A सर्टिफिकेट दिले आहे.

सिनेमातील इंटीमेट सीन्समुळे ब्रेट लीला फुटला घाम...
ब्रेट लीने सांगितले, की या सिनेमात मला असे काहीही करायचे नव्हते, जे अश्लील वाटेल. सिनेमातील सीन्स अतिशय सुंदररित्या चित्रीत झाले आहेत. सिनेमात ब्रेट ली आणि तनिष्ठा यांच्यात अनेक इंटीमेट सीन्स आहेत, जे चित्रीत करण्यात ब्रेट लीला खूप अडचण आली होती. 'अनइंडियन' हा सिनेमा भारतात १९ ऑगस्ट रोजी रिलीज होणारेय.

'हाऊसफूल ४' मध्येही झळकू शकतो ब्रेट ली...
'अनइंडियन' हा सिनेमा इंग्रजीत असून अनुपम शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाचे चित्रीकरण सिडनीत झाले आहे. ब्रेट ली क्रिकेटर असून अभिनेता म्हणून हा त्याचा पहिलाच सिनेमा आहे. 'हाऊसफूल ४' या सिनेमातसुद्धा तो झळकण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, 'अनइंडियन' सिनेमातील ब्रेट ली आणि तनिष्ठाची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...