आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'ब्रदर्स'चा ट्रेलर रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर आगामी 'ब्रदर्स' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 'ब्रदर्स' ही दोन भावांची कहाणी आहे. डेविड फर्नांडिस (अक्षय कुमार) आणि मोंटी फर्नांडिस (सिद्धार्थ मल्होत्रा) यांच्या भोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले असून दोघेही फायटर्स आहेत.
खास गोष्ट म्हणजे, बालपणी या दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम असतं, मात्र काळानुसार दोघांमध्ये कटुता निर्माण होते. एक वेळ अशी येते, जेव्हा दोघेही भाऊ एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभे ठाकतात. या फायटिंगमध्ये कोण जिंकणार, हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल.
अभिनेत्री जॅकलिनने या सिनेमात अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली असून जॅकी श्रॉफसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत या सिनेमात दिसणार आहेत. 'ब्रदर्स' हा सिनेमा करण मल्होत्राने दिग्दर्शित केला असून करण जोहर, हीरु जोहरने एंडेमोल इंडियासोबत मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या 14 ऑगस्टला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.