आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खान आत्महत्या प्रकरण : CBI ने दाखल केले सूरज पांचोलीविरुद्ध आरोपपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने बुधवारी नवोदित अभिनेता सूरज पांचोलीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने, सरकारही आश्चर्यचकित झाले आहे. जिया खान (25) हिच्या आत्महत्येचा तपास कुठवर आला, अशी विचारणा पंधरा दिवसांपूर्वी सत्र न्यायालयाने सीबीआयकडे केली होती. त्यानंतर बुधवारी अचानक सीबीआयने अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री झरिना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने, या केसमधील विशेष सरकारी वकील दिनेश तिवारी यांनी आश्चर्य व्यक्त केले. अ‍ॅड. तिवारी यांनी उच्च न्यायालयात जियाची आई राबिया खान यांच्यातर्फे केस लढवली आहे. त्यामुळे सीबीआयने जिया खानने आत्महत्या केल्याचे आरोपपत्रात म्हटले असेल, तर त्याला आव्हान देण्यात येईल, असेही अ‍ॅड. तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले.
3 जून 2013 रोजी जिया खान मुंबईतील आपल्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये जियाची आई राबिया खान यांनी हायकोर्टात याचिका दाखल करुन त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचे म्हटले होते. 16 जानेवारी 2014 रोजी जुहू पोलिसांनी याप्रकरणी 447 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये जियाच्या मृत्यूसाठी सूरज पांचोलीला जबाबदार ठरवण्यात आले होते. जुलै 2014 मध्ये बॉम्बे हायकोर्टने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.
जिया खान आत्महत्या प्रकरण
** 3 जून 2013 रोजी जिया खानचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला.
** जियाचा मित्र सूरज पांचोलीला अटक.
** आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक.
** 16 जानेवारी 2014 रोजी पोलिसांनी 447 पानांचे आरोपपत्र दाखल केले.
** जुलै 2014 मधअये सीबाआयकडे प्रकरण सोपवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...