आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरजने वचन तोडल्यानेच जियाची आत्महत्या, चार्जशीटमध्ये CBI चा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : जिया खान. - Divya Marathi
फाइल फोटो : जिया खान.
मुंबई - अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या चार्जशीटमध्ये नवे खुलासे झाले आहेत. बॉयफ्रेंड सूरज पांचोली याने नात्याला एक वर्ष झाल्यानंतर एंगेजमेंट करण्याचे वचन पाळले नाही म्हणूनच जियाने आत्महत्या केल्याचे यात म्हटले आहे. दरम्यान जियाची आई राबिया यांच्या दाव्यानुसार यासंबंधी एक महत्त्वाचा पुरावा त्यांनी सीबीआयकडे दिला आहे.

प्रकरण काय...
- अभिनेत्री जिया खानने 3 जून 2013 ला फाशी घेऊन आत्महत्या केली होती.
- जियाची आई राबियाने हायकोर्टात याचिका दाखल करून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. जियाचा खून झाल्याचा आरोप राबियाने केला होता.
- सीबीआयने तपासानंतर 9 डिसेंबरला कोर्टात चार्जशीट दाखल केले. त्यात जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर गंभीर आरोप आहेत.
- कोर्टाने या खटल्याची सुनावणी 18 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. कोर्टाने चार्जशीटमधील मुद्दे मीडियामध्ये लीक झाल्याच्या मुद्यावर सीबीआयला फटकारले आहे.
- जिया खान (25) अमेरिकेत जन्मली होती. तिने ‘नि:शब्द’ आणि ‘गजनी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
- तर सूरज आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा आहे. नुकताच त्याचा ‘हीरो’ चित्रपट रिलीज झाला होता.
- सूरजवर IPC च्या कलम 306 अंतर्गत जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

सीबीआयच्या चार्जशीटमधून मिळणारी काही उत्तरे
1. सूरजने जियाला दिलेले वचन मोडले होते का?
- इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सीबीअाय चार्जशीटमध्ये जिया उर्फ नफिसा रिझवी हिच्या पत्राचा उल्लेख आहे.
- त्यात लिहिले होते की, ‘तुमने वादा किया था की, हमारे रिश्ते को एक साल होते ही हम सगाई कर लेंगे। मैं प्रेग्नेंट होने से डरती थी। मुझे हमारे बच्चे का अबॉर्शन कराना पड़ा।’
- सीबीआयच्या मते या नोटवरून हे स्पष्ट होते की, आरोपी सूरजने जियाला खोटे वचन दिले होते. त्यामुळेच जिया आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली.

2. जियाला मारहाण व्हायची का ?
- चार्जशीटनुसार एकदा एका महिलेने जियाला तिच्या शरिरांवरील जखमांबाबत विचारले होते.
- त्यावर जियाने, तिला सूरजने मारहाण केली असे उत्तर दिले होते.

3. आत्महत्येच्या दिवशी काय झाले ?
- चार्जशीटनुसार 3 जून 2013 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत जिया तिच्या आईबरोबर होती.
- जियाने सांगितले होते की, हैदराबादच्या एका निर्मात्याने दोन तेलुगु चित्रपट आणि एका आयटम साँगसाठी निवडले आहे.
- जियाने सूरजला फोन केला पण त्याने फोन रिसिव्ह केला नाही.
- नंतर सूरजने सायंकाळी 7.45 वाजता फोन उचलला. त्यानंतर सूरजने नोकराच्या हातून जियासाठी फुले पाठवली.
- रात्री 9.20 वाजता जियाने सूरजला फोन करून बुके पाठवण्यासाठी धन्यवाद म्हटले.
- अचानक रात्री 9.53 वाजता जियाने तिच्या वॉचमनला बुके डस्टबिनमध्ये फेकायला सांगितले. तोपर्यंत जियाला दुसरा फोन आला नव्हता.

4. जियाला झाला होता गैरसमज
- रात्री 10 वाजता सूरजने जियाला फोन केला आणि जुहूच्या एका हॉटेलमध्ये ज्वेलरी डिझायनरला भेटण्यास सांगितले. जियाने डिजायनरबरोबर तसे कन्फर्म केले.
- पण डिझायनर म्हणाली की, सूरजने दुसऱ्या दिवशी बोलावले आहे. त्यावर सूरज आणि जिया यांच्यात वाद झाला.
- जियाने सूरजवर खोटं बोलत असल्याचा आरोप केला. त्यावर सूरजने डिझायनरबरोबर चर्चा केली आणि तिचा गैरसमज दूर करण्यास सांगितले कारण भेटीसाठी दुसऱ्या दिवसाची वेळ ठरली होती.
- पण जियाने ऐकले नाही. जियाच्या मॅसेजेसनाही सूरजने उत्तर दिले नाही.

5. मृत्यूपूर्वी झाला वाद ?
- जियाने सूरजच्या नोकराला फोन करून सूरजला फोन करण्यास सांगण्याचा मॅसेज दिला. पण सूरजने वडिलांबरोबर बिझी असल्याचे सांगितले.
- चार्जशीटनुसार सूरज खोटे बोलला. त्यावेळी सूरजबरोबर आदित्य पांचोली नव्हते.
- जिया सूरजच्या घरी पोहोचली. नोकराने सूरजला तसे सांगितले. सूरजला जियाबरोबर थेट बोलायचे नव्हते. त्यामुळे त्याने एका मित्राला जियाशी बोलायला सांगितले.
- त्यामुळे नाराज झालेली जिया घरी परतली. रात्री 10.45 वाजता सूरज आणि जिया यांच्यात बराच वेळ भांडण झाले.
- सूरज म्हणाला की, ज्वेलरी डिझायनरला भेटवून त्याला जियाला सरप्राइज द्यायचे होते. पण जिया त्याची जासुसी करत होती.
- रात्री 11.20 वाजता जियाची आई राबिया घरी परतली तेव्हा जियाने फाशी घेतलेली होती. राबियाने लगेचच जियाच्या मित्रांना फोन केला.
- विशेष म्हणजे या मित्रांपैकी एकाच्या घरी आदित्य पांचोली स्वतः होते.
- आदित्य स्वतःच मित्रांना जियाच्या घरी घेऊन आले. नंतर आदित्य यांनी सूरजला फोन बंद करायला सांगितले.
पुढे वाचा, प्रकरणाशी संबंधित आणखी काही महत्त्वाचे मुद्दे...