आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा, सोशल मीडियावरुन दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 79 व्या वर्षी हसऱ्या चेहऱ्याच्या या अभिनेत्याने आयुष्याच्या रंगमंचावरुन एक्झिट घेतल्यामुळे अनेकांनीच हळहळ व्यक्त केली आहे. कपूर यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच त्यांना श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रिया सुळे, वीरेंद्र सेहवाग, अजय देवगण, सोनू सूद, आमिर खान, जावेद जाफरी, संजय दत्त, शबाना आझमी, सुश्मिता सेन, पुलकित सम्राट, कुणाल खेमू यांच्यासह अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून शशी कपूर यांना श्रद्धांजली दिली. दिल्ली येथे सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही शशी कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी काही क्षण मौन पाळण्यात आले.


पुढील स्लाईड्सवर वाचा, कोण काय म्हणाले... 

बातम्या आणखी आहेत...