आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील शेट्टीच्या वडिलांची प्रार्थना सभा: ऐश्वर्या, काजोलसह या कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः वडील वीरप्पा शेट्टी यांचे 28 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचे वडील होते. त्यांच्या निधनानंतर सुनील शेट्टी यांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. यावेळी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, अक्षय कुमार, काजोल, अनुपम खेर, बॉबी देओल, राजपाल यादव, चंकी पांडे आणि सोनू सूदसह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

वयाच्या 93 व्या वर्षी झाले वीरप्पा शेट्टी यांचे निधन 
वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वीरप्पा शेट्टी यांनी अखेरचा श्वास घेतला. 2013 साली त्यांना लकवा झाला होता. तेव्हापासून ते आजारी होते. सुनील शेट्टी यांनी त्यांच्या घरीच वडिलांसाठी आयसीयू तयार केले होते. वडिलांची काळजी घेता यावी यासाठी सुनील शेट्टी यांनी ब-याच काळापासून सिनेमे साईन केले नव्हते. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, वीरप्पा शेट्टी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या कलाकारांची छायाचित्रे...   
बातम्या आणखी आहेत...