आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा, बॉलिवूडचे हे नावाजलेले सेलिब्रिटी आहेत राधे माँचे भक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दलेर मेंहदी, सुभाष घई, डॉली बिंद्रा, मनोज तिवारी राधे माँसोबत - Divya Marathi
दलेर मेंहदी, सुभाष घई, डॉली बिंद्रा, मनोज तिवारी राधे माँसोबत

हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या स्वयंघोषित गुरु राधे माँचे एकामागून एक नवनवीन कारनामे उघड होत आहेत. आता तर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोज महाजन यांचा मुलगा राहुल महाजनने त्याच्या ट्विटर अकाऊण्टवरुन राधे माँचे मिनी स्कर्टमधील छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यामुळे राधे माँ ट्रेंडिंगमध्ये आली आहे.
राधे माँचे सामान्यच नव्हे तर अनेक सेलिब्रिटीसुद्धा भक्त आहेत. प्रसिद्ध गायक राधे माँसाठी भक्तिगीत गातांना दिसले आहेत. मोठमोठ्या बॅनरवर सेलिब्रिटी आणि राधे माँची छायाचित्रे लावून तिचा प्रचार केला गेला. राधे माँच्या भक्तांच्या यादीत पॉप सिंगर दलेर मेंहदी, भोजपूरी गायक मनोज तिवारी, भोजपूरी अभिनेता रवि किशन टीव्ही कलाकार डॉली बिंद्रा, दिग्दर्शक सुभाष घई गायक हंसराज हंस, अॅड गुरु प्रल्हाद कक्कर, नवज्योतसिंग सिद्धू या मोठ्या नावांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा, राधे माँसोबतची सेलिब्रिटींची छायाचित्रे...