आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने सारासह तर ऐश्वर्याने अराध्यासह घेतले बाप्पाचे दर्शन, जया बच्चनही दिसल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपतीचे दर्शन घेताना ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि खालच्या फोटोमध्ये जय बच्चन. - Divya Marathi
गणपतीचे दर्शन घेताना ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली, मुलगी सारा आणि खालच्या फोटोमध्ये जय बच्चन.
एंटरटेनमेंट डेस्क - गणेशोत्सवाचा काळ हा सर्वांसाठीच अत्यंत उत्साहाचा असा असतो. गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत विविध ठिकाणी असलेल्या बाप्पांच्या गणपतींच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. अनेक ठिकाणी आयोजन सेलिब्रिटींना मंडळात दर्शनासाठी किंवा आरतीसाठी आमंत्रित करत असतात. सेलिब्रिटींनाही या दहा दिवसांत चाहत्यांना भेटण्याची संधी मिळत असते. शिवाय देवाचा आशिर्वाद घेण्याची चालून आलेल्या संधीचे सोने करावे म्हणून सेलिब्रिटीही मंडळांमध्ये हजेरी लावत असतात. नुकतेच सचिन तेंडुलकरने वडाळा येथील जीएसबी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्याबरोबर त्याची मुलगी सारा आणि पत्नी अंजलीही होती. याच गणेशाच्या दर्शनासाठी अॅक्ट्रेस ऐश्वर्या रायही तिची मुलगी अराध्याबरोबर आली होती. तर भायखळा येथील एका गणेश मंडळामध्ये जया बच्चन यांनी गणपतीची पुजा करून दर्शन घेतले. लोकांनी यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये या सेलिब्रिटींचे फोटो क्लिक केले. त्यापैकी काही फोटो आपण पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, गणरायाच्या दर्शनादरम्यानचे सेलिब्रिटींचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...