आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडबरोबर बहिणीच्या घरी गणपती दर्शनासाठी पोहोचला सलमान, प्रियंकाही दिसली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनाक्षी, सलमान आणि युलिया. - Divya Marathi
सोनाक्षी, सलमान आणि युलिया.
एंटरटेनमेंट डेस्क -  सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी शुक्रवारी बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. अर्पिताच्या घरी स्थापना झालेल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती लावली. सर्वात आधी सलमान खान अर्पिताच्या घरी पोहोचला. त्याच्यासोबतच हेलन, अरबाज खान, प्रियांका चोप्रा, युलिया वंतूर, सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, करिश्मा कपूर, आशा पारेखसह इतर अनेक सेलेब्सचीही उपस्थिती होती. प्रियांका लाइट पिंक कलरच्या सूटमध्ये तर युलिया रेड कलरच्या अनारकली पॅटर्न सूटमध्ये गॉर्जियस दिसत होती. त्याशिवाय टीव्ही स्टार रागिनी खन्ना, शब्बीर अहलुवालिया, कांची सिंह, अनुप सोनीसह इतर सेलेब्सही पोहोचले. 

लग्नानंतर अर्पिताच्या घरी पहिलाच मोठा कार्यक्रम 
अर्पिता आणि आयुष शर्मा यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे. अर्पिताने स्वतः संपूर्ण तयारी करून घेतली. एका मुलाखतीत अर्पिताने सांगितले की, दरवर्षी बाप्पाच्या स्थापनेनंतर घरी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येत असतात. त्यामुळे मम्मी आणि डॅडीना त्यांचा वेळ मिळत नाही. त्यामुळे यावर्षी तिच्या घरी स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सलमानच्या घरी कोणकोणत्या सेलिब्रिटींची उपस्थिती होती.. 
बातम्या आणखी आहेत...