आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना सभेत सोनू निगमसह अनेक कलाकारांनी वाहिली दिव्या दत्ताच्या आईला श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ राहुलसोबत दिव्या दत्ता, सोनू निगम - Divya Marathi
भाऊ राहुलसोबत दिव्या दत्ता, सोनू निगम

मुंबईः बुधवारी अभिनेत्री दिव्या दत्ताच्या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. सोनू निगम, अनुप सोनी, समीर सोनी, अमोल गुप्ते, मधुरिमा निगम, विकास भल्ला, इला अरुणसह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कलाकारांनी शोकाकुल दिव्या दत्ता आणि तिचा भाऊ राहुलचे सांत्वन केले. दिव्या दत्ताची आई नलिनी दत्ता यांचे रविवारी निधन झाले.
दिव्या सात वर्षांची असताना झाले होते वडिलांचे निधन
लुधियानाची दिव्या दत्ता सात वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. आई नलिनी यांनी राहुल आणि दिव्याचे संगोपन केले. निलिनी दत्ता या डॉक्टर होत्या. नोव्हेंबर महिन्यात नलिनी यांची बायपास सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांना इन्फेक्शन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पुढे पाहा, संबंधित फोटोज...