आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS: पुन्हा एकदा आई होणारेय ही अॅक्ट्रेस, दुस-यांदा देणार जुळ्या बाळांना जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सेलिना जेटलीच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. 35 वर्षीय सेलिना दुस-यांदा आई होणार आहे. विशेष म्हणजे सेलिना दुस-यांदा जुळ्या बाळांना जन्म देणारेय. सेलिना पाच वर्षांच्या जुळ्या मुलांची आई असून व्हिस्टन आणि विराज अशी तिच्या मुलांची नावं आहेत. पीटर हे सेलिनाच्या नव-याचे नाव असून ते दुबईतील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. डॉक्टरांनी सेलिनाला ऑक्टोबरची ड्यू डेट दिली आहे. 

बातमी ऐकून शॉक्ड झाले सेलिना-पीटर... 
पुन्हा गरोदर असण्याविषयी सेलिना म्हणाली, ''पुन्हा जुळी मुलं होणार असल्याचं कळताच आम्हाला धक्का बसला.  डॉक्टर अल्ट्रासाऊंड करत असतानाच पीटरने त्यांना विचारलं की यावेळीसुद्धा जुळीच मुलं आहेत का? त्यावर डॉक्टर हो म्हणाले. ते ‘हो’ म्हणताच आम्हा दोघांनाही धक्काच बसला.''
 
पुढे वाचा, आनंद व्यक्त करताना आणखी काय म्हणाली सेलिना... 
बातम्या आणखी आहेत...