आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिनाने दिला होता जुळ्या मुलांना जन्म, एका बाळाचा काही वेळातच झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सेलिना जेटलीने शनिवारी रात्री दुसऱ्यांदा आई बनल्याची बातमी फेसबुकवर दिली होती. पण या गुड न्युजसोबत सेलिनाने एक वाईट बातमीही दिली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सेलिनाने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की तिने ट्वीन्सला जन्म दिला पण त्यातील एक जास्त वेळ तिच्यासोबत राहु शकला नाही. सेलिनाने 10 सप्टेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यापैकी एका मुलाला हार्ट प्रॉब्लेम होता..
 
 सेलिनाने तिच्या मुलांचे नाल आर्थूर आणि शमशेर ठेवले होते. जन्मापासूनच शमशेरला हृद्याचा त्रास होता जो नीट होऊ शकला नाही आणि त्यामुळेच शमशेरचा मृत्यू झाला. सेलिनाने 10 सप्टेंबर रोजी दुबईत जुळ्या मुलांना जन्म दिला होता. पती पीटर हाग आणि सेलिना जेटली अगोदरही जुळ्या मुलांचे आईवडील आहेत. सेलिनाच्या पहिल्या जुळ्या मुलांचे नाव विंस्टन आणि विराज आहे जे आता 4 वर्षाचे झाले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, सेलिनाने दोन महिन्यांपूर्वीच गमावले आहेत वडील...
बातम्या आणखी आहेत...