आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसक दृष्ये, शिवीगाळ असल्याने सेंसर बोर्डाने नाकारला रवीनाचा 'मातृ'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  रवीना टंडनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मातृ ला सेंसर बोर्डाने परवानगी नाकारली असल्याची माहिती मिळाली आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यावर बनलेल्या या चित्रपटात हिंसक दृश्ये, शिवीगाळ मोठ्या प्रमाणात असल्याने हा चित्रपट सेंसर बोर्डाने नाकारल्याची चर्चा आहे. 
 
असेही सांगण्यात येते की, केवळ 10 मिनिटातच सेंसर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी आणि त्यांची टीम चित्रपट सोडून निघून गेले. चित्रपटाला ए सर्टीफिकेट दिले तरी चित्रपटाच्या काही सीन्सवर कात्री चालवावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.
 
यावर चित्रपटाचे निर्माते अंजूम रिझवी यांनी सदर माहिती चुकीची असल्याचे सांगितले आहे.   त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "मला माहिती नाही अशा अफवा कोण पसरवत आहेत. चित्रपट सोमवारी सेंसर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दाखविण्यात येणार आहे, त्यानंतरच सर्व ठरणार आहे. "
 
अजून काय म्हटले सेंसर बोर्डाचे अधिकारी वाचा पुढच्या स्लाईडमध्ये..
 
सेंसर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चित्रपटाच्या स्क्रिनींगअगोदर आम्हाला एक स्क्रिप्ट दिली जाते. त्यावरुन आम्हाला कोणत्या सीनला आमच्या हस्तक्षेपाची गरज आहे हे कळते. पण  'मातृ' सुरू झाल्यानंतर केवळ 10 मिनिटातच आम्हाला कळाले की, जी स्क्रिप्ट आमच्याकडे आहे ती या चित्रपटापेक्षा पुर्णपणे वेगळी आहे.
 
काय म्हणाले चित्रपटाचे निर्माते..
 
यावर चित्रपटाचे निर्माते अंजूम रिजवी यांनी याबाबत वेगळेच कारण सांगितले. ते म्हणाले की काही तांत्रिक कारणांमुळे या चित्रपटाचे स्क्रिनींग बंद करण्यात आले पण दुसऱ्यांदा हा चित्रपट सेंसर बोर्डाला दाखविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 
 
काय आहे चित्रपटाची कथा...
 
- 21 एप्रिलला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात रवीना टंडन विद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका आईच्या भूमिकेत दिसणार आहे जी आपल्या मुलीचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या आरोपींबद्दल लढा देताना दिसून येणार आहे.
 
- यावेळी तिचा नवरा, नातलग आणि इतर लोक तिला सर्व विसरुन जाण्याचा सल्ला देतात. 
- चित्रपटाची कथा बलात्कार सारख्या गुन्ह्यांविरुद्ध आणि त्यासाठी असणाऱ्या न्यायव्यवस्थेवर उजेड टाकण्याचा एक प्रयत्न आहे.
 
जेव्हा बलात्काराच्या सीनच्या शूटिंगनंतर तीन रात्री झोपली नाही रवीना.....
 
- याचवर्षी जानेवारीमध्ये रवीनाच्या या चित्रपटाबद्दल चर्चा होती. तेव्हा तिने सांगितले की, बलात्काराच्या सीनच्या शूटिंगनंतर तीन रात्री रवीनाला झोप लागली नाही. ती यादरम्यान रात्रभर रडत असे.
 
- रवीनाने सांगितल्यानुसार, ती या चित्रपटामध्ये इतकी गुंतून गेली होती की तिच्या वैयक्तिक आयुष्यात पण त्याचे परिणाम दिसू लागले होते. 
 
निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणावर आहे 'मातृ'
 
असा अंदाज लावला जात आहे की, अश्तर सैयद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 16 डिसेंबर 2012 साली झालेल्या निर्भया प्रकरणावर आहे. 
 
पण रवीनाने यांचे खंडन केले आहे. तिने सांगितले की, या प्रकरणाचा चित्रपटाशी काहीही संबंध नाही.  पण चित्रपटामध्ये हील दिल्लीमधील घटना असल्याचे दाखविण्यात आले आहे.
रवीनाना सांगितले की, हे दुःखद आहे की, जेव्हा आम्ही या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले तेव्हाच निर्भया घटना घडली. याबाबतीत आम्हाला वृत्तपत्रातून माहिती मिळाली. रवीनाने चित्रपटाचे निर्भया प्रकरणाशी असलेले साधर्म्य केवळ योगायोग आहे.
 
2 वर्षानंतर झळकणार रवीना टंडन..
 
दोन वर्षानंतर रवीना टंडन चित्रपटात झळकणार आहे. याअगोदर बॉम्बे वेल्वेट चित्रपटात तिने एक लहान भूमिका केली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा चित्रपटाचे ट्रेलर..
बातम्या आणखी आहेत...