आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 कोटींच्या फसवणूक प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला आहे. कोलकात्याच्या एका कंपनीने शिल्पा आणि राज यांच्यावर 9 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे.
एम. के. मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अतिरिक्त संचालक देबाशीष गुहा यांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या इर्सेशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबाबत तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिस उपायुक्त मुरली धर यांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक, विश्वासघात आणि जबरदस्तीने वसुली, धमकावल्याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कंपनीने नऊ कोटी रुपयांचे शेअर्स विकत घेतले होते आणि दोन वर्षांत दहापट रक्कम परत करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी त्यांचे आश्वसन पूर्ण केले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.