आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOX OFFICE : 'बद्रीनाथ की दुल्हनिया'ने पहिल्या दिवशी जमवला 12 कोटींचा गल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः शुक्रवारी रिलीज झालेल्या वरुण धवन आणि आलिया भट स्टारर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 12.25  कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा सिनेमा यावर्षातील तिसरा सर्वात मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट केलंय, की ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चा पहिल्या दिवशी प्रभाव पाहायला मिळाला. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये सिनेमाची चर्चा अधिकच रंगली. पहिल्या दिवशी चित्रपटाने 12.25 कोटींची कमाई केली आहे.
 
करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ला समीक्षकांची पसंती मिळाली आहे. वरुण आणि आलिया यांच्या अभिनयासह दिग्दर्शक शशांक खैतान यांच्या कामाचीही प्रशंसा केली जात आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारमध्ये सिनेमा कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवली आहे.  
 
- 2017 च्या हाइएस्ट ओपनिंग कलेक्शनचा रेकॉर्ड शाहरुख खानच्या 'रईस'च्या नावी आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 20.42 कोटींची कमाई केली होती. 
- या यादीत अक्षय कुमार स्टारर 'जॉली एलएलबी 2' दुस-या स्थानावर आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 13.20 कोटींचा गल्ला जमवला होता.
- हृतिक रोशनच्या 'काबिल'ला पछाडत या यादीत 'बद्रीनाथ की दुल्हनिया'ने तिसरे स्थान पटकावली आहे. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, 2017च्या टॉप 5 Biggest Openers सिनेमांविषयी..  
बातम्या आणखी आहेत...