आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याच्या या लूकवरुन प्रभावित होता तिचा बर्थ-डे केक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या रॉय-बच्चनचा 1 नोव्हेंबरला 44वा वाढदिवस साजरा झाला. यावेळी तिच्यासाठी खास बर्थ-डे केक ऑर्डर करण्यात आला होता. ऐश्वर्याने कान्स 2017 मध्ये रेड कार्पेटवर ज्या प्रकारचा ड्रेसमध्ये रॅम्पवॉक केले होते. त्या आइस ब्ल्यू प्रिंसेस एल्सा गाऊनची प्रतिकृती केकवर तयार करण्यात आली होती. 
 
प्रोड्यूसर सृष्टीन पोस्ट केला फोटो... 
- प्रोड्यूसर सृष्टी आर्य हिने या कस्टमाइज केकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यासोबत लिहिले आहे, Some cakes are just a Little extra special ...  ऐश्वर्याने कान्ससाठी डिझायनर मिशेल सिनकोने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. तेव्हा ज्यांनी ज्यांनी ऐश्वर्याला पाहिले त्यांना सिंड्रेलाची आठवण झाली होती. या ड्रेसची प्रतिकृती अॅशच्या बर्डडे केकवर होती. 
- हा केक सृष्टीने स्पेशली अॅशसाठी तयार करुन घेतला होता, तोही तिची बहिण तानियाकडून. 
- अॅशने वाढदिवसाची कोणतीही जंगी पार्टी आयोजित केली नव्हती. याचवर्षी तिचे वडील कृष्णराज रॉय यांचे निधन झाले आहे. 
- बर्थडेच्या छोटेखानी सेलिब्रेशनला फक्त रॉय आणि बच्चन कुटुंबिय व काही क्लोज फ्रेंड आले होते. याशिवाय अॅश आई व मुलीसह सिद्धी विनायक मंदिरात गेली होती. 
बातम्या आणखी आहेत...