आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOSHOOT: राज कपूरसह गतकाळातील प्रसिद्ध स्टार्सच्या रुपात अवतरली विद्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(किशोर कुमार आणि राज कपूर यांच्या रुपात विद्या बालन)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने अलीकडेच एक खास फोटोशूट करुन घेतले आहे. एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये ती किशोर कुमार, गुरुदत्त, चार्ली चॅपलिन आणि राज कपूर या प्रसिद्ध स्टार्सच्या लूकमध्ये दिसत आहे. शूटची थीम या स्टार्सच्या आनंद, दुःखाभोवती गुंफण्यात आली होती. या स्टार्स आणि त्यांच्या सिनेमांविषयी विद्या काय विचार करते, हे देखील तिने यावेळी सांगितले.
गुरुदत्त यांच्याविषयी...
गुरुदत्त यांचे सिनेमे जग आणि आयुष्य यांच्याविषयीची कमालीचा अनुभव देणारे आहेत.
किशोर कुमार यांच्याविषयी...
किशोर दा लोक काय म्हणतील, याचा विचार करत नव्हते. ते आपल्या पद्धतीने काम करायचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे, या विचारसरणीचे ते होते. त्यांचे वागणे अनेकांना रुड वाटायचे. मात्र त्यांची हीच खासियत मला पसंत आहे.
चार्ली चॅप्लिन यांच्याविषयी..
चॅपलिन तर चॅपलिन आहे. ते एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्यात कुठल्याही परिस्थितीत लोकांच्या चेह-यावर हास्य फुलवण्याची किमया होती.
राज कपूर यांच्याविषयी...
एका सामान्य व्यक्तीची इमेज त्यांच्याशिवाय इतर कुणीही उत्कृष्टरित्या दर्शवू शकत नाही. त्यांचे सिनेमे आजही रिलेवंट आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, विद्याचा चार्ली चॅपलिन, गुरुदत्त आणि राज कपूर यांचा अवतार...