आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 6 महिन्यांनी समोर आले प्रीती झिंटाचे Wedding Photos, वर-वधूचा होता राजेशाही थाट…

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यावर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री प्रीती झिंटाने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान अमेरिकन जीन गुडइनफसोबत लग्न केले. 29 फेब्रुवारी रोजी लॉस एंजिलिस येथे हे दोघे विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या या ‘चोरी चोरी चुपके चुपके’ लग्नाची सर्वांना माहिती झाली होती. प्रीतीने अमेरिकेतील तिचा प्रियकर जेन गूडइनफशी लग्नगाठ बांधली. अभिनेते कबीर बेदी, सुश्मिता सेन, फराह खानसह अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अतिशय खाजगी समारंभात पार पडलेल्या या लग्नाला कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता.
प्रीतीच्या लग्नाबद्दल अनेकांनाच कुतुहल असतानाच आता तिच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर गाजत आहेत. पारंपारिक भारतीय कलाकुसरीने सजलेल्या या पोशाखामध्ये प्रीतीच्या गालावरील खळी तिचे सौदर्य आणखीनच खुलवत आहे. त्यामुळे सध्या सिनेमांपासून दूर असलेल्या प्रिती झिंटाची ही छायाचित्रे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

मुंबईत दिले होते ग्रॅण्ड रिसेप्शन..
अमेरिकेत लग्नबंधनात अडकल्यानंतर प्रीतीने तिच्या कलाकार मित्रमंडळींसाठी एका पार्टीचेही आयोजन केले होते. तिला शुभेच्छा देण्यासाठी आणि तिच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अभिनेता सलमान खानसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित, सुष्मिता सेन, महेश भूपति आणि लारा दत्ता, शाहिद कपूर-मीरा राजपूत, भूषण कुमार, अभिषेक कपूर आणि अतुल अग्निहोत्रीसह अनेक सेलेब्स या पार्टीत सहभागी झाले होते. याच पार्टीत सलमान पहिल्यांदाच 'गर्लफ्रेंड' यूलिया वंतूरसोबत दिसला होता.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, प्रीती झिंटाच्या लग्नाची राजेशाही थाटातील छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...