Home »News» Children Day Special: Bollywood Stars Share Experience

मुलगी सुहाना SRK ला म्हणत नाही पापा, यांनीही सांगितला एक्सपिरियंस

फहीम रूहानी, ओंकार कुलकर्णी | Nov 14, 2017, 14:31 PM IST

  • शाहरुख खानला त्याची मुलगी सुहाना ब्रो म्हणते.
मुंबई - वडील, या नात्याबद्दल फारसे कधी बोललं जात नाही. एक शांत माणुस जो कायम आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत झिजत असतो. त्याच्या डोळ्यात दिसणारा राग आणि समाधान हे मुलं योग्य मार्गाने चालली आहेत यासाठी असतो. मात्र, आता वडील आणि मुलांच नात हे अनेक घरांमध्ये मैत्रीचे असल्याचे दिसते. 'अहो बाबा'चे आता 'अरे बाबा' कधी झाले हेही अनेक बाबा अनुभवत असतील. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलेब्सचेही त्यांच्या मुलांसोबतचे नाते हे असेच असते. शाहरुख खानला त्याची मुलगी सुहाना पापा किंवा डॅड म्हणत नाही तर ती त्याला ब्रो म्हणते.

आज (14 नोव्हेंबर) बालदिना निमीत्त DivyaMarathi.Com ने बॉलिवूड कलाकारांना काही प्रश्न विचारले..
सुहाना मला ब्रो म्हणते
- शाहरुख खानने सांगितले, माझे माझ्या वडिलांसोबतचे नाते आणि आता मी वडिल झाल्यानंतर माझे माझ्या मुलांसोबतचे नाते यात फार फरक असल्याचे मला वाटत नाही. माझ्या मुलांना माझे आई-वडील पाहाता आले नाही. मी फार लहान असताना माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, मात्र आमचे नाते हे फार मैत्रीपूर्ण होते. आम्ही एकमेकांशी कोणत्याही विषयावर बोलू शकत होतो. मी देखील माझ्या मुलीसोबत कुल होऊन गप्पा मारतो. मुलासोबत तर मग मी त्याचा मित्रच असतो. कारण ते बॉय टू बॉय नाते असते.
- सुहानाला नेहमी वाटत असते की माझ्यासोबत राहावे. सेटवर ती माझ्यासोबत असली की लोक आम्हाला पाहून आश्चर्य व्यक्त करतात. मुले आणि बापामध्ये एवढे मैत्रीचे नाते कसे असू शकते असा प्रश्न त्यांना पडतो. सुहाना मला ब्रो म्हणते तर आर्यन मला पापा म्हणतो.
पुढील स्लाइडमध्ये, सैफ अली खान आणि फरहान अख्तर सांगतात त्यांच्या वडिलांविषयी...

Next Article

Recommended