आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स सीन कॉन्ट्रोव्हर्सीवर चित्रांगदा सिंहने तोडले मौन, सांगितली संपूर्ण कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रांगदा सिंह - Divya Marathi
चित्रांगदा सिंह
मुंबई: 'बाबूमोशाय बंदूकबाज' सिनेमाच्या सेटवर झालेल्या सेक्स सीन कॉन्ट्राव्हर्सीवर अभिनेत्री चित्रांगदा सिंहने मौन तोडले आहे. तिच्या सांगण्यानुसार, दिग्दर्शक कुशान नंदी शॉट पूर्ण झाल्यानंतरसुध्दा रीटेक घेण्यास सांगत होता. सोमवारी (13 जून) आलेल्या बातम्यांनुसार, कुशानने चित्रांगदाला सेक्स सीन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर ती रडत सेटवरून निघून गेली आणि सिनेमा सोडणार असल्याचाही खुलासा केला होता. एका मुलाखतीदरम्यान चित्रांगदाने संपूर्ण वादावर बातचीत केली.
काय म्हणाली चित्रांगदा...?
चित्रांगदाने सांगितले, 'जसे मी शॉट संपवला तेव्हा कुशान म्हणाला मला हा शॉट आवडला नाही. त्याला माझ्याकडून सेक्स सीन हवा होता. हा सीन मला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत द्यायचा होता. कुशानची ईच्छा होती, की मी नवाजच्या अंगावर झोपावे. मी त्या सीनदरम्यान पेटीकोट परिधान केलेला होता. मी माझी अवस्था त्याला समजावून सांगितली. मी त्याला म्हणाले, 'झाले तर आहे, असे का करतोय? प्लीज समजून घे, मी पेटीकोट परिधान केलाय. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यादरम्यान आमचा वाद झाला. काही मिनीटानंतर नवाज माझ्याकडे आले आणि म्हणाले, की इंटीमेट सीन चांगला शूट झाला.'
चित्रांगदा पुढे सांगते, 'सोमवारी सकाळी जवळपास 4:30 वाजता नवाज आणि माझ्यात बराच वेळ बोलणे झाले. तेव्हा त्यांनी सांगितले, की कुशान म्हणात होती, की तो दुसरी अभिनेत्री घेणार आहे.'
पुढे वाचा, चित्रांगदाने आणखी काय-काय सांगितले...