आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर दिग्दर्शकाने केली सेक्स सीनची मागणी, भडकलेल्या चित्रांगदाने सोडला सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शकाने सेक्स सीनची डिमांड केली आणि चित्रांगदा सिंहने सिनेमा सोडला. - Divya Marathi
दिग्दर्शकाने सेक्स सीनची डिमांड केली आणि चित्रांगदा सिंहने सिनेमा सोडला.
मुंबई: अभिनेत्री चित्रांगदा सिंह गेल्या काही दिवसांपासून लखनौमध्ये दिग्दर्शक कुशान नंदीच्या (प्रितीश नंदी) \'बाबूमोशाय\' सिनेमाचे शूटिंग करत होती. परंतु नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, 6 दिवसांच्या शूटिंगनंतर चित्रांगदा हा सिनेमा सोडून मुंबईला रवाना झाली आहे. दिग्दर्शकाने तिला नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सेक्स सीन देण्याची मागणी केली होती. परंतु तिला ते मान्य नव्हते. 
 
काय करायचे होते चित्रांगदाला? 
- सिनेमात एका सीनमध्ये नवाज चित्रांगदाला बेडवर ओढत आणतो. त्यांना जाणवते, की कुणीतरी त्यांना पाहत आहे. 
- फर्स्ट टेकने कुशान समाधानी नव्हता. त्याने चित्रांगदाला नवाजच्या अंगावर येण्याचा आदेश दिला आणि म्हणाला, \'सेक्सचा सीन दे.\'
- कुशानचा आदेश ऐकताच चित्रांगदा भडकली. सूत्रांच्या सांगण्यानुसार, ती कुशानला म्हणाली, तू एखाद्या इंटीमेट सीनसाठी माझा अपमान कसा करू शकतोस. यावर कुशानने तिला एकांतात येऊन बोलण्यास सांगितले. 
- परंतु चित्रांगदा भडकली आणि ती कुशानला म्हणाली, \'तू सर्वांसमोर इतक बोललास तर आता
एकांतात जाऊन काय बोलायचे बाकी आहे. तू स्वत:ला काय समजतोस.\'
 
शॉट पूर्ण करून रडत सेटवरून निघून गेली चित्रांगदा...
सूत्रांच्या सांगण्यानुसार, चित्रांगदाने तीन टेकमध्ये शॉट पूर्ण केला आणि रडत सेटवरून बाहेर आली. त्यानंतर तिने नवाजसोबत बातचीत केली आणि म्हणाली, \'मी हा सिनेमा सोडणार आहे.\'
 
कुशानच्या मित्राने दिला नकार... 
- या संपूर्ण प्रकरणात कुशानने काहीच सांगितले नाही. परंतु त्याच्या एका मित्राने त्याच्यावर लावलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. 
- तो म्हणाला, \'चित्रांगदा सीनदरम्यान सतत वाद घालत होती. आम्ही इरोटिक सिनेमा बनवत नाही. दिग्दर्शकाचे काम असते, की कलाकारांकडून चांगला शॉट करून घ्यायचा. चित्रांगदाचा परफॉर्मन्स चांगला नव्हता.\'
- \'सिनेमा पुढे ढकलावा लागत होता. म्हणून आम्ही तिला काढून टाकले. ती खूप घमंडी आहे आणि तिला स्क्रिट बदलून हवी होती. ती सेटवरसुध्दा उशीरा येत होती.\'
 
सुरुवातीपासूनच अभिनेत्री आणि दिग्दर्शकामधील संबंध बिघडलेले...
- रिपोर्ट्सनुसार, चित्रांगदा आणि कुशान यांचे सिनेमाच्या सुरुवातीपासूनच खटके उडत होते. चित्रांगदाला दिलेल्या कॉस्ट्युमने ती समाधानी नव्हती. 
- तिला पेटीकोट आणि लो-कट ब्लाऊज परिधान करणयास सांगितले होते. त्यावर ती म्हणाली, \'आजकाल गरीब लोकसुध्दा एका साडीने स्वत:ला झाकतात.\'
- चित्रांगदाने वेस्ट बंगालमध्ये झालेल्या सिनेमाच्या फर्स्ट शेड्यूलदरम्यान सांगितले होते, की ती पेटीकोट आणि लो-कट ब्लाऊज परिधान करणार नाही. परंतु लखनौमध्येसुध्दा दिग्दर्शकाने हिच मागणी केली होती. 
 
लो-कट ब्लाऊजवर चित्रांगदाचा दुहेरी वागणूक...
- ऐकिवात आहे, की कुशानने चित्रांगदाला विचारले होते, की तिने \'देसी बॉइज\'मध्ये लो-कट ब्लाऊज परिधान केले होते. मग या सिनेमात असा कॉस्ट्युम घालण्यास नकार का देतेय?
- तिने उत्तर दिले, \'मी त्या सिनेमात आक्षेप घेतला नाही. कारण तो अक्षय कुमारचा कमर्शिअल सिनेमा होता. त्यात त्यांनी माझे लाँग शॉट्स घेतले होते. तू एक आर्ट सिनेमा बनवतोय आणि क्लोजअप शॉट्स घेत आहेस.\'
 
अर्थिक समस्यांत अडकलाय \'बाबूमोशाय\'...
- \'बाबूमोशाय\'च्या रस्त्यातील सर्वात मोठी अडचण पैशांची आहे. 
- मागील वर्षी वेस्ट बंगालमध्ये शूटिंगदरम्यानसुध्दा सिनेमात अनेक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर अंदाजा लावण्यात येत होता, की कुशानने सिनेमा डबाबंद केला आहे. 
 
सध्या चित्रांगदाच्या खात्यात कोणताच सिनेमा नाही...
- \'बाबूमोशाय\' या एकमेव सिनेमात चित्रांगदा काम करत आहे. हा सिनेमा सोडल्यानंतर तिच्याकडे कोणताच सिनेमा नाहीये. 
- 2003मध्ये \'हजारो ख्वाहिशे\' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणा-या चित्रांगदाने आतापर्यंत 10 सिनेमांत काम केले. परंतु अद्याप ती स्वत:ला सक्सेसफुल अभिनेत्री सिध्द करू शकली नाहीये.
- तिचा लास्ट रिलीज \'गब्बर इज बॅक\' (2015) सिनेमाचे \'आओ राजा\' आयटम साँग केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चित्रांगदाचे फोटो...