आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसह आमीर खानच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कारण गुलदस्त्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
एंटरटेनमेंट डेस्क - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवूड अॅक्टर आमीर खानच्या खरी पोहोचले. यावेळी फडणवीस यांच्याबरोबर पत्नी अमृता देखिल होत्या. फडणवीस नेमके कशासाठी आमीरच्या घरी पोहोचले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी आमीरला स्वाईन फ्लू झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री आमीरला भेटायला गेले असल्याचे अंदाज लावले जात आहेत. 
 
अमिताभबरोबर झळकल्या होत्या अमृता
यापू्र्वी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झळकल्या आहेत. म्युझिक व्हिडीओमध्ये त्यांनी अमिताभबरोबर स्क्रीन शेअर केले होते. ग्लॅमर इंड्स्ट्रीतील काही कार्यक्रमांमध्येही अमृता फडणवीस दिसत असतात. त्यामुळे आमीर खानच्या घरी गेल्यानंतर आता अमृता फडणवीस आणखी नवीन प्रोजेक्टचा विचार करत आहेत का असा प्रश्नही समोर येत आहे. पण अद्याप त्यांनी ही भेट का घेतली याचे नेमके कारण समोर आलेले नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधितPHOTOS 
बातम्या आणखी आहेत...