आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी क्लबच्या जवळ पोहोचला अक्षयचा 'टॉयलेट...', असे करताहेत प्रमोशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अक्षय कुमार आणि भूमी पेडनेकर स्टारर टॉयलेट : एक प्रेम कथा चित्रपटाने मंगळवारपर्यंत 83 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चौथ्या दिवसाच्या कलेक्शनच्या तुलनेत (12 कोटी) पाचव्या दिवशी मंगळवारी चित्रपटाने 66 टक्के अधिक कमाई केली. यादिवशी चित्रपटाने 20 कोटी कमावले. चित्रपटाने मंगळवारपर्यंत 83.45 कोटी कमावले आहे. 
 
तीन दिवसांत शाहरुखच्या चित्रपटाला पछाडले.. 
- 'टॉयलेट' ने पहिल्या तीन दिवसांतच 51 कोटींचे कलेक्शन करत फर्स्ट वीकेंड कमाईमध्ये शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर 'जब हॅरी मेट सेजल' ला पछाडले होते. याचित्रपटाने तीन दिवसांत 46 कोटी कमावले होते. 
 
मंगळवारपर्यंतचे कलेक्शन.. 
- ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी 13 कोटी तर दुसऱ्या दिवशी 17 कोटींची कमाई केली होती. 
- तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी चित्रपटाची कमाई वाढून 21 कोटी झाली होती. मात्र चौथ्या दिवशी परत कमाई कमी झाली आणि फक्त 12 कोटींचे कलेक्शन झाले. 
- पाचव्या दिवशी स्वातंत्र्यदिनी परत कमाई वाढली यादिवशी चित्रपटाने 20 कोटींची कमाई केली. 
 
First Day 13.10 कोटी
Second Day 17.10 कोटी
Third Day 21.25 कोटी
Fourth Day 12 कोटी
Fifth Day 20 कोटी
Total 83.45 कोटी
 
प्रमोशनसाठी व्हिडीओ फंडा..
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या व्हिडीओचा फंडा अवलंबला जात आहे. वेगवेगळ्या स्टार्सचे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून अपलोड करून चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. रणवीर सिंहनेही नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तो टॉयलेटसाठी भूमीच्या घरात घुसला आणि नंतर काय झाले ते तुम्हीच पाहा. (व्हिडीओ अखेरच्या स्लाइडवर)
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, फर्स्ट वीकेंडमध्ये 50 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे चित्रपट... 
बातम्या आणखी आहेत...