आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कपिलकडून चूक झाली, त्याला माफ कर; या कॉमेडियनने मागितली सुनीलची माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉमेडियन सुनील पॉलने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने कपिल शर्माच्यावतीने सुनील ग्रोवरची माफी मागितली आहे. 'एका मोठ्या कलाकाराला, मोठा मंचच मोठं करत असतो. तुम्ही दोघांनी मिळून या शोला मोठे केले आहे. तुम्ही दोघे या शोच्या दोन चाकांप्रमाणे आहात. त्यामुळे कपिलला माफ कर आणि परत ये' अशा शब्दात सुनील पॉलने सुनील ग्रोवरला समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे बोलतांना सुनील पॉल म्हणाला- मोठा मंच मिळण्यासाठी मोठे भाग्य लागते. तुम्हाला तो मिळाला आहे. त्यामुळे तो टिकवून ठेवा. मी आजही कॉमेडी शो करतो. परंतू, मला असा मंच मिळाला नाही. माझी कला मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचू शकली. तुम्हाला मिळालेल्या मोठ्या मंचामुळे तुम्ही कॉमेडिचे स्टार बनला आहात. कृपया या मंचाला उद्वस्थ होऊ देऊ नका, अशी कळकळ सुनील पॉलने व्यक्त केली आहे. 

वेगळ होऊन तुम्ही दोघेही काही खास करू शकणार नाही, अशी भीती मला वाटत आहे. मागच्यावेळीही तु वेगळा झाला होता. परंतू, अत्यंत वाईट लोकांसोबत तुला काम करावे लागले होते. तेव्हा तुला वाइट राजकारणाचा सामना करावा लागला होता. मला मान्य आहे, कपिलकडून चूक झाली. परंतू, त्याने कॉमेडीसाठी खूप मोठे काम केले आहे. त्यामुळे त्याला माफ कर आणि परत शो सुरू कर अशा शब्दात सुनील पॉलने सुनील ग्रोवरची माफी मागितली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा सुनील पॉलचा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...