आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ME TOO: \'आई कार चालवत होती, माझ्या स्कर्टमध्ये होता त्याचा हात\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मल्लिका दुआ - Divya Marathi
मल्लिका दुआ
नवी दिल्ली - अगदी लहानपणापासून अनेक महिला कळत न कळत लैंगिक शोषणाला बळी ठरतात. त्यापैकी मोजक्याच महिला ते बोलून दाखवण्याचे धाडस दाखवतात. याच मुद्यावर हॉलिवुड अॅक्‍ट्रेस एलिसा मिलानो हिने सोशल मीडियावर #MeToo असा हॅशटॅग सुरू केला आहे. त्याला जगभरातून प्रतिसाद मिळत असून आता प्रसिद्ध कॉमेडियन मल्लिका दुआ हिने सुद्धा उत्तर दिले आहे. लहानपणी आपल्या आईसोबत कारमध्ये जात असताना आपल्यासोबत घडलेला प्रकार तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. एलिसाच्या मिलानोच्या आवाहनाला मल्लिकासह आतापर्यंत 27 हजारहून अधिक महिलांनी उत्तर देऊन आपली आपबिती मांडली आहे.

काय म्हणाली मल्लिका दुआ
>> मल्लिकाने सांगितल्याप्रमाणे, लहानपणी तिच्याच कारमध्ये हा प्रकार घडला आहे. कार तिची आई चालवत होती आणि मागे ती आपल्या बहिण आणि त्या माणसासोबत बसली होती. 
>> आई पुढे कार चालवत होती, त्याचवेळी मागच्या सीटवर बसलेला माणसाने मल्लिकाच्या स्कर्टमध्ये हात घातला होता. एवढेच नव्हे, तर दुसरा हात त्याने मल्लिकाच्या मोठ्या बहिणीच्या मागे ठेवला होता. 
>> प्रवासात पोहोचेपर्यंत ती व्यक्ती मल्लिकाच्या स्कर्टमध्ये हात ठेवून होती. दुसरा हात तिच्या बहिणीच्या मागे ठेवून सगळीकडे फिरवत होता. त्यावेळी मल्लिकाचे वय 7 वर्षे होते. तर बहिणीचे वय 11 वर्षे होते. 
 

वडिलांनी जबडाच तोडला
मल्लिका, तिची बहिण आणि आई एका कारमध्ये जात होता. मल्लिकाचे वडील एका दुसऱ्या कारमध्ये होते. मल्लिका आणि बहिणीने हा प्रकार जेव्हा त्यांच्या वडिलांना सांगितला तेव्हा वडिलांनी रागाच्या भरात त्याचा जबडाच तोडला होता. मल्लिका सध्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मध्ये ती जज आहे. एआयबीच्या कॉमिक व्हिडिओंमुळे ती युट्यूब स्टार बनली होती. ती ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांची मुलगी आहे.
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे उत्तर आणि एलिसाने केलेले आवाहन...
बातम्या आणखी आहेत...